शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवाचे आयोजन

By admin | Published: April 08, 2016 1:41 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन १० ते १४ एप्रिलपर्यंत करण्यात आले आहे.

पाच दिवसीय सोहळा : विविधांगी कार्यक्रम बाराभाटी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन १० ते १४ एप्रिलपर्यंत करण्यात आले आहे.यात १० एप्रिलला सकाळी धम्म रॅली काढण्यात येणार असून समता सैनिक दल व गावकरी सहभागी होतील. यानंतर समता इंटरटेनमेंट बुध्दभीम गीतांचा कार्यक्रम, उद्घाटन सत्र व मार्गदर्शन सोहळा होईल. उद्घाटन सामाजिक न्याय व पालकमंत्री राजकुमार बडोले, साहित्यिक कविता मडावी यांच्या अध्यक्षतेखाली होईल. अतिथी म्हणून दयाराम कापगते, रचना गहाणे, किशोर तरोणे, लीना डोंगरवार, गुलाब कोरेटी, धर्मेश जायस्वाल, महादेव बोरकर, ठाणेदार सुनील पाटील, नितीन राठोड, प्रा. बलवीर, के.एन. शहारे, विशाखा साखरे, नरूले, नितीन पुगलिया, जगदिश मोहबंशी, पचारे, रघुनाथ लांजेवार, मुलचंद गुप्ता, धम्मचारी गजभिये आदी उपस्थित राहतील.वक्ते अ‍ॅड. भूपेंद्र रायपुरे, प्रा. जावेद पाशा कुरैशी, धम्मचारी अमृतसिध्दी मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ७.३० वाजता वामनदादा कर्डक आंबेडकरी जलसा चंद्रपूरद्वारे ‘आम्ही तुफानातले दिवे’ सुलभा खोब्रागडे, बाबुराव जुमनाके, सचिन फुलझेले व संच सादर करतील. ११ एप्रिलला मुक्तांगण युवामंचतर्फे सायंकाळी ६.३० वाजता युगपुरुष महात्मा फुले जयंती यांची साजरी होणार आहे. अध्यक्षस्थानी के.ए.रंगारी राहतील. अतिथी म्हणून दिनेश जांभूळकर, अश्वनी लांजेवार, एन.के. उके, यशवंत बोरकर, के.एम. भैसारे, दिगांबर रामटेके, एम.बी. इंदूरकर उपस्थित राहतील. सायंकाळी ७.३० वाजता भीमगीत, समूह नृत्यस्पर्धा होईल. मंगळवार १२ एप्रिलला सायंकाळी ८.३० वाजता तीन अंकी नाट्य ‘स्वप्न भंगले सुखाचे’ तरूण मित्र मंडळ सादर करणार आहेत.बुधवारी १३ एप्रिलला सकाळी ९ वाजता संपूर्ण ग्रामस्वच्छता अभियान होणार असून एस.एस. चव्हाण यांचा अंधश्रध्देवर कार्यक्रम होईल. रात्री ८.३० वाजता ‘युगपुरूष महात्मा ज्योतिबा फुले’ एकपात्री प्रयोग प्रा. रेवाराम खोब्रागडे सादर करणार आहे. या वेळी नामदेव डोंगरवार, प्रा. मंगला गडकरी, लांजेवार, देविदास बडोले, सुमन शहारे, सुप्रिया डोंगरे, रेवचंद शहारे, हिंमत राऊत, लिला सांगोळकर उपस्थित राहतील. गुरूवारी १४ एप्रिलला सकाळी ध्वजारोहण, भगवान बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दीप प्रज्वलन, सायंकाळी ४ वाजता धम्मरॅली तसेच झाकी निघणार आहे. या पाच दिवसांच्या कार्यक्रमात मनोरंजनासह मार्गदर्शनाचा लाभही नागरिकांना घेता येईल. या पाच दिवसीय विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन नवेगावबांध येथे करण्यात आले असून या कार्यक्रमांना परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष भास्कर बडोले, उपाध्यक्ष के.आर.उके, सचिव डी.डी.भालाधरे, कोषाध्यक्ष के.ए.रंगारी, सहसचिव एन.के.उके व सल्लागार राजकुमार उंदिरवाडे यांनी केले आहे. (वार्ताहर)