खातिया : या जगात कुठलीही गोष्ट किंवा कार्य विनाकारण होत नाही. प्रत्येकाला काही ना काही कारण असते. यासाठी बुद्धधम्माच्या केंद्रीय सिद्धांताला समजणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा तालुका महासचिव कोमलकुमार नंदागवळी यांनी केले.
ग्राम शाखा कटंगटोला येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित वर्षावास कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. अध्यक्षस्थानी बंशीलाल खोब्रागडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका शाखा उपाध्यक्ष मनोहर भावे, सर्कल अध्यक्ष योगीराज वंजारी, कार्यालयीन सचिव विजय मेश्राम, मयाराम गजभीए, महिला उपाध्यक्ष अस्मिता उके, संतोष उके, नंदकिशोर खोब्रागडे, हेमराज खोब्रागडे, कुवरलाल खोब्रागडे, अतुल खोब्रागडे, अविनाश खोब्रागडे, पिंकी मेश्राम, रूपवंता खोब्रागडे, वैशाली खोब्रागडे, आदी उपासक-उपासिका उपस्थित होते. संचालन सर्कल महासचिव मेश्राम यांनी केले. आभार खोब्रागडे यांनी मानले.