लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपल्या विविध मागण्यांना घेऊन जिल्हा परिषदेसमोर महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शुक्रवारपासून (दि.७) आपल्या विविध मागण्यांना घेऊन साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे.जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे, विभागीय अध्यक्ष नूतन बांगरे,सरचिटणीस अनिरूध्द मेश्राम यांच्या नेतृत्त्वात सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात आमगाव, सालेकसा, देवरी, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव, गोंदिया, गोरेगाव व तिरोडा या आठही तालुक्यातील शिक्षक संघाचे अडीच हजार शिक्षक सहभागी झाले आहेत. सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते जीपीएफमध्ये जमा करा, डीसीपीएसचे खाते अद्यावत करून पावत्या द्या, १५०० रूपये प्रोत्साहन भत्ता विना अट द्या, अतिरिक्त घरभाडे भत्ता लागू करावा, मुख्याध्यापकांच्या जागा भरण्यात याव्यात, सेवानिवृत्त शिक्षकांकडून वसूल करण्यात आलेली संगणक अर्हता प्राप्त न केल्याबाबतची वसुली परत करण्यात यावी, देय रजा मंजूर करून तीन दिवसाचे वेतन अदा करण्यात यावे, गणित विषय शिक्षकाच्या जागा भरण्यात याव्यात,विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यात यावी, देय रजा मंजूर करून तीन दिवसाचे वेतन देण्यात यावे, अप्रशिक्षीत शिक्षण सेवकांची शिक्षण सेवक पदावर व्यथीत कालावधी वरिष्ट वेतनश्रेणी करिता ग्राह्य धरण्यात यावे, शालेय विद्युत देयके ग्राम पंचायतीकडून भरण्यात यावे, प्राथमिक शिक्षकांना सामूहिक विम्यात समाविष्ट करण्यात यावे, शाळांना ४ टक्के सादील राशी देण्यात यावी, सडक-अर्जुनीचे जीपीएफ व एलआयसी अपहार झालेली रक्कम शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यात यावी, १२ वर्ष व २४ वर्ष सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना विनाअट चट्टोपाध्याय व वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात यावी या मागण्यांचा समावेश होता.आंदोलनात यु.पी.पारधी, सुधीर बाजपेयी, केदार गोटेफोडे, नागसेन भालेराव, हेमंत पटले, विनोद लिचडे, यशोधरा सोनवाने, शंकरलाल नागपुरे, वाय. एस.मुंगुलमारे,ओमेश्वरी बिसेन, शंकर चव्हाण, पवन कोहळे, सुमेधा गजभिये, विजय डोये, बी.बी.ठाकरे, वाय.एस.भगत, वाय.डी.पटले,सुरेश रहांगडाले, विनोद चौधरी, दुर्गाप्रसाद कोकोडे, जी.जी.खराबे, दिनेश बोरकर, नरेंद्र आगाशे,ए.डी. पठाण, मोरेश्वर बडवाई, मयूर राठोड, ज्ञानेश्वर लांजेवार, रमेश संग्रामे, गणेश चुटे, सी.एस.कोसरकर, चंद्रशेखर दमाहे, नरेश बडवाईक यांच्यासह अडीच हजार शिक्षक सहभागी झाले होते.
प्राथमिक शिक्षकांचे जि.प.समोर साखळी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 11:16 PM
सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते जीपीएफमध्ये जमा करा, डीसीपीएसचे खाते अद्यावत करून पावत्या द्या, १५०० रूपये प्रोत्साहन भत्ता विना अट द्या, अतिरिक्त घरभाडे भत्ता लागू करावा, मुख्याध्यापकांच्या जागा भरण्यात याव्यात, सेवानिवृत्त शिक्षकांकडून वसूल करण्यात आलेली संगणक अर्हता प्राप्त न केल्याबाबतची वसुली परत करण्यात यावी, .......
ठळक मुद्देअडीच हजार शिक्षकांचा सहभाग: विविध १५ मागण्यांसाठी आंदोलन