लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी-डाकराम : श्री चक्रधर स्वामीच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेल्या सुकडी-डाकराम येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त श्री चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथीय पाच दिवसीय यात्रा उत्सवाला रविवारी (दि.१) पासून सुरूवात होणार आहे. या पाच दिवसीय यात्रेमध्ये श्री चक्रधर स्वामी देवस्थान समिती अंतर्गत विविध कार्यक्रम, भजनसंध्या आणि महाप्रसादाचे आयोजन केले आहे. माजी आ. दिलीप बंसोड यांच्या वतीने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा व भजन संध्याचे आयोजन केले आहे.भगवान श्री चक्रधर स्वामीनी गुजरात प्रदेशातील भडोच नामक नगरामध्ये सुमारे शके ११४२ भाद्रपद महिन्याच्या शुध्द द्वितीय या तिथीवर अवतार धारण करुन महाराष्ट्रात परिभ्रमण करीत लोकांचे दु:ख, रोग दूर करीत आणि महाराष्ट्राला आपली कर्मभूमि मानून समाजात पसरलेली अंधश्रध्दा व कर्मकांडाचे निर्मूलन केले.जिल्ह्यातील सुकडी-डाकराम येथे भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सुमारे शके ११६० मध्ये चरणाने पवित्र झालेल्या हे स्थान ८५८ वर्षापासून असलेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे अतिशय प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिध्द आहे. वर्षभर संपूर्ण भारतातून श्री चक्रधर स्वामींच्या दर्शनासाठी यात्रेकरु येथे येतात. परिसरातील सर्व लोकांचे कुलदैवत असलेल्या सर्वज्ञांच्या या मंदिराची विशेषता अशी की मराठीचा आद्यग्रंथ असलेला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूच्यां लीळाचरित्र आणि या लीळाचरित्रात उल्लेखीत डाकराम सुकडीचे वैशिष्टये असे की भगवान श्री चक्रधर स्वामींनी केलेल्या अनेक लीळा आहेत. परंतु या संपूर्ण लीळांमधील एक आगळी वेगळी व एकमेव लीळा म्हणजेच डाकरामची व्याघ्र विद्रावन ही होय.डाकराम हे गावाचे नाव आहे. पूर्वी हे गाव जंगल गावाला लागून असल्यामुळे वाघाची भीती होती. ती भीती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीनी सिंहगर्जना करुन दूर केली. वाघाला पळवून लावून लोकांचे भय दूर करुन संपूर्ण गावाला अभय दिले. बोदलकसा व नागझिरा अभयारण्य अगदी जवळ असल्यामुळे इतर गावात वाघ, बिबट या वन्यप्राण्यांचा उपद्रव सुरु असतो. परंतु सुकडी डाकराम या गावाच्या सीमेमध्ये वाघ प्रवेश करीत नाही. तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीनी या गावाला वरदान दिले आहे असा समज या परिसरातील गावकऱ्यांचा आहे. तेव्हापासूनच येथील गावकरी पाच दिवसीय आनंदोत्सव व यात्रात्सव सुरू केला. ही यात्रा चैत्र पौर्णिमेपासून प्रारंभ होवून पंचमीला समाप्त होते. ८५० वर्षापासून सतत सुरु असलेल्या या यात्रेत लाखोच्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. श्री चक्रधर स्वामी सर्व भाविक भक्तांची मनोकामना पूर्ण करतात.हजारो भाविक येणारसुकडी डाकराम येथील महानुभाव पंथीय यात्रेला महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर, अहमदनगर, सातारा, फलटन, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडाऱ्यासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यातून हजारो भाविक सुकडी-डाकराम येथील यात्रेला येतात. पंचमीच्या दिवशी लाखो संख्येने भाविक उपस्थित राहून सायंकाळी ७ वाजता श्री चक्रधर स्वामींच्या पालखीत सहभागी होतात. या वेळी श्री चक्रधर स्वामी देवस्थान समिती व ग्रामपंचायत सुकडी-डाकराम सर्वच भाविकांची व्यवस्था करीत आहे.
चक्रधरस्वामींची महानुभाव पंथीय यात्रा आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 9:42 PM
श्री चक्रधर स्वामीच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेल्या सुकडी-डाकराम येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त श्री चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथीय पाच दिवसीय यात्रा उत्सवाला रविवारी (दि.१) पासून सुरूवात होणार आहे.
ठळक मुद्देपाच दिवस चालणार यात्रा : विविध राज्यातील नागरिकांची उपस्थिती, विविध कार्यक्रम