सोनपुरी : बाघ इटियाडोह प्रकल्पातून सालेकसा व आमगाव तालुक्याला उन्हाळी (रबी) पिकांसाठी कालव्याच्या माध्यमातून पाणी देण्यात येते. त्यानुसार यंदा पाणी सोडण्यात आले. मात्र या पाण्यामुळे सावंगी येथील लालसिंह मच्छीरके या शेतकऱ्याच्या शेतातील चना पिकाचे नुकसान झाले. येथे एकदाही उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्यात आलेले नव्हते. त्यामुळे मच्छीरके यांनी यंदा दोन ते तीन एकरात चना आणि गहू लावले होते. यंदा मात्र कोटरा बांधमध्ये पर्याप्त पाणी असल्यामुळे उन्हाळी धान पिकासाठी पाणी सोडण्यात आले. यामुळे मात्र मच्छीरके यांच्या शेतात पाणी शिरले व त्यांच्या चना पिकाचे नुकसान झाले. पाटबंधारे विभागाच्या लापरवाहीने पिकांचे नुकसान झाले असल्याने मच्छीरके यांनी तलाठी, तहसील कार्यालय व पाटबंधारे विभागाला निवेदन देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. (वार्ताहर)
पाण्याने चणा पिकाचे नुकसान
By admin | Published: February 06, 2017 12:44 AM