आयुक्तांची भेट : मत्स्य व्यवसायासाठी मॉडेल ठरणारपरसवाडा : वैनगंगा नदी काठावर वसलेले चांदोरी खुर्द हे गाव मत्स्य व्यवसायासाठी सोईस्कर स्थळ आहे. काळी माती असल्याने पाणी साचून ठेवते. वैनगंगेत मुबलक पाणी शेतकऱ्यांना भात पिकाबरोबर मासेमारी व्यवसायासाठी उपयुक्त आहे. चांदोरी खुर्द हे गाव आंध्र प्रदेशसारखे मत्स्य व्यवसायासाठी तयार होऊ शकते. मासेमारी व्यवसाय करणारे ढिवर, भोई लोक पुढे येतील तर नक्कीच आपण हे गाव जिल्ह्यात मॉडेल म्हणून तयार केले जाईल, अशी ग्वाही मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त परवेज समीर यांनी दिली.पारंपरिक मच्छिमारांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. नदी व पाटबंधारे मार्फत तलावात खात्यामार्फत ५ वर्ष विना मूल्य मत्स्यबीज संचयन करण्यात येते. मच्छीमारांना प्रती वर्ष ५ किलो पर्यंत नॉयलान सूत, १ जाळीच्या किंमतीवर ५० टक्के अनुदान, होडी, डोंगा, नौका खरेदी करीता त्याच किंमतीच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त अनुदान ३००० पर्यंत संस्थाना आर्थिक बळकट कामकाज सुधारणा घडवून आणण्यासाठी दहा हजार व पिण्याच्या ज्याचे भांडवल दोन हजार, दारिद्र रेषेखालील मच्छिमारांना घरकूल बांधण्यासाठी ४० हजार अर्थसहाय्य, संस्थेच्या क्रिया सभासदांच्या अपघाती मृत्यू झाल्यास एक लाख, मासेमारी संकट निवारण निधी योजनेमध्ये तलावात मासेमारी करताना बुडून मृत्यू झाल्यास १ लाख, कायमचे अपंगत्व झाल्यास ५० हजार देण्यात येते.राष्ट्रीय मिशन फॉर प्रोटीन सप्लीमेंट व्यक्तीत लाभाची योजनेंतर्गत तळी बांधकाम त्यातील मत्ससंवर्धनासाठी केंद्रशासन एक एकर ते ५ हेक्टर नवीन तलावासाठी बांधकाम जागेचे सात बारा, नकाशा यासाठी तीन लाख व १.२० लाख, माशाची काढणी, निविष्ठा अनुदान, मासेमारी विक्रीसाठी बाजारपेठ, मासेची निकृष्ट, तळ्याची उत्पादकता कशी वाढवावी, मत्स्य तळे कसे असावे. यावर ही आपण शेतकऱ्यांना मासेमारी व्यवसाय करणारे यांना सभा घेऊ लवकरच मत्स्य व्यवसायात विभागामार्फत या परिसरात पाणी असलेल्या ठिकाणी लाभ देऊ याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा,असे आवाहन करण्यात आले.यासाठी जिल्हाधिकारी व अन्य विभागाचे संबंधीत अधिकारी यांना गावाबद्दल माहिती देऊन नियोजन करू व अन्य शेतीपेक्षा मत्स्यशेती फायद्याची आहे, असे शेतकऱ्यांना सांगितले.शेतात जाऊन मातीची पाहणी निरीक्षक केले. स्वप्नील नारायण प्रसाद जमईवार यांनी मत्स्य व्यवसाय उत्पादनासाठी पुढाकार घेतला. चांदोरी या गावाला परवेज समीर आयुक्तांनी गावाला भेट दिली. यावेळी गावातील शेतकरी व उपसरपंच हुपराज जमईवार, सुभाष अंबुले, शाहील मालाधारी, योगेंद्र जमईवार, छोटू अंबुले, जयप्रकाश भोयर, नभी मालाधारी व अन्य शेतकरी होते. (वार्ताहर)मालगुजारी तलावाच्या खोलीकरणासोबतच मत्स्यबीज संगोपण, तळ्यांच्या बांधकामास प्राधान्य माजी मालगुजारी तलावांचे खोलीकरणामुळे तलावात मृत पाण्याचा साठा राखून ठेवण्याची क्षमता वाढेल.सोबतच तलावाच्या एका भागात मध्यम आकाराची संगोपन निसंवर्धन तळीच्या निर्मितीमुळे शास्त्रोक्त पध्दतीने मत्स्यजीरे संगोपन करणे शक्य होईल. मत्स्य व्यावसायिकांना, मच्छिमारांना संगोपन कार्यवाढीवर नियंत्रण ठेवणे शक्य.पाण्याची पातळी व गुणधर्मावर नियंत्रण ठेवणे शक्य.संगोपनपासून प्राप्त मत्स्यबीज गोळा करणे, उचल करणे व इतर तलावात हलविणे शक्य होईल.माजी मालगुजारी तलावात व संगोपन तळ्यात एकाच वेळेस मत्स्यबीजांचे संगोपन व संवर्धन करण्यास मुभा राहील.
चांदोरी खुर्द होणार मत्स्य केंद्र
By admin | Published: February 25, 2016 1:42 AM