शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

मनरेगाच्या कामात अनागोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 11:58 PM

तिरोडा पंचायत समिती अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना प्रत्येक ग्रामपंचायत माध्यमातून राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेत मोठा घोळ सुरू असून नियमांना डावलून कामे केली जात असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देनियमांना डावलून कामे सुरू : तिरोडा पंचायत समितीचा अजब कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना प्रत्येक ग्रामपंचायत माध्यमातून राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेत मोठा घोळ सुरू असून नियमांना डावलून कामे केली जात असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गाव विकासासाठी ग्रामसभेच्या माध्यमातून विविध विकास कामांचे नियोजन केले जाते. यात पांदण रस्ते, माती काम, मुरूम, शौचालय, वृक्ष लागवड, गोठा बांधकाम, शोषखड्डे, सिमेंट रस्ते, खडीकरण, भातखाचर व नाला सरळीकरणाच्या कामांचा समावेश आहे.मात्र तालुक्यात काही ठिकाणी कामे न करताच निधीची उचल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काही सुरू असलेल्या कामातील अनागोंदी कारभार पुढे आल्यानंतर शासनाने तेथील कामाचे देयके न काढण्याचे निर्देश संबंधितांना दिले. मात्र यानंतरही देयक काढली जात असल्याची माहिती आहे. तालुक्यातील काही कामांबद्दल नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. चौकशी न करता काढली जात आहे. जुन्या शौचालयांना पैसे देण्यात आले आहेत. पांदण रस्ता, मुरुम कामाचे देयक देण्यात येऊ नये, असे आदेश सचिवांनी दिले आहे. तरी अधिकाऱ्यांनी शौचालये व गोठ्यांच्या बिलांमध्ये अधिकच्या रक्कमेचा समावेश करुन निधी वितरीत केला जात आहे. चांदोरी खुर्द येथील पांदण रस्त्याचे काम करण्यात आले. तेसुद्धा फक्त १०० मीटरच्या आत पण त्या ठिकाणी मुरुम १९ ब्रॉस टाकण्यात आले. बाकीचे मुरूम खडीकरणाच्या रस्त्यावर टाकण्यात आले. याची तक्रार करण्यात आली आहे. पण खंडविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.अर्धे आम्ही-अर्धे तुम्हीतिरोडा पंचायत समिती अंतर्गत कामात पांदण रस्त्याचे देयक मोजमाप न करता सरळ पुस्तिकेत नोंद करून पैसे घेतले. अर्धे आम्ही-अर्धे तुम्ही या तत्वावर या योजनेतंर्गत अनागोंदी कारभार सुरू आहे. गोठे, वृक्ष, शौचालय, रस्ते, मुरुम या कामांत बोगस मजुरांची नावे दाखवून पैसे घेतले जातात. या सर्व कामांबाबत तालुक्यातील व चांदोरी खुर्द येथील रस्ते व शौचालयांची व गोठ्यांची चौकशी करण्यात यावी. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.काम रस्त्याचे, पैसे गोठ्याचेतिरोडा पं.स. खंडविकास अधिकारी यांना विचारले असता, याची मला जाणीव नाही व मी नवीन आलेला आहे. चौकशी करुन सांगतो असे सांगितले. सदर देयकाची कामे ही तत्कालीन खंडविकास अधिकारी यांचे अपघात झाले होते, त्या काळातील होते. त्यानंतर प्रभारी कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्यात आला. त्यांनी सदर बिल काढून दिल्याचे सांगितले. कनिष्ठ अभियंता रामदास बावणकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, मी ११७ ब्रासची मोजमाप पुस्तिकेत करुन दिली, पण स्वाक्षरी केली नाही. माझ्यावर काही जणांनी दबाव टाकला. सदर मोजमाप पुस्तिका चुकीची आहे, असे त्यांनी सांगितले.