गोंदिया : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असतानाही काही तरुण विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने त्यांच्यावर जिल्हाभरातील पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. ६ मे रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी १२ गुन्हे दाखल दाखल करण्यात आले आहे.
रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सावरीटोला येथे विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस शिपाई हितेश लांजेवार यांनी तक्रार केली आहे. दुसरी कारवाई अर्जुनी माेरगावच्या बाजारवाडी एस.एस.जे. कॉलेज रोड येथे करण्यात आली. ही कारवाई नायक पोलीस शिपाई महेन्द्र पुण्यपेड्डीपार यांनी केली. तिसरी कारवाई अर्जुनी मोरगाव येथे पश्चिम बंगाल हिंसाचार व अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील रब्बी धान खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत तहसीलदार विनोद मेश्राम यांना निवेदन देणाऱ्यांवर पोलीस शिपाई राहुल रामदास चिचमलकर यांनी कारवाई केली. चवथी व पाचवी त्रिमूर्ती चौक रावणवाडी येथे करण्यात आली. नायक पोलीस शिपाई शेखर पटले यांनी केली आहे. सहावी कारवाई रावणवाडी येथे विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस शिपाई विक्की दगडे यांनी कारवाई केली आहे. सातवी कारवाई रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सावरी येथे नायक पोलीस शिपाई शेखर पटले यांनी केली आहे. आठवी कारवाई गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मनोहर चौक गोंदिया येथे विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस नायक प्रकाश गायधने यांनी कारवाई केली आहे. नववी व दहावी कारवाई त्रिमूर्ती चौक रावणवाडी येथे पोलीस शिपाई दुर्गेश बिसेन यांनी केली. अकरावी कारवाई रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चारगाव येथे विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस शिपाई विक्की दगडे यांनी केली. बारावी कारवाई गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिंडकेपार रोडवर पोलीस नायक श्यामकुमार कोरे यांनी केली आहे. सर्व आरोपींवर संबंधित पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८, २६९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.