२ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजता मसल पॉवर या जिममध्ये पाच मुले जीम मारत असल्याने गोंदिया शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, सहायक फौजदार घनश्याम थेर, पोलीस नायक भेंडारकर, पोलीस हवालदार भगत हे गोंदिया शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करीत असताना रेल्वे चौकी नंगपुरा मुर्री गोंदिया येथील मसल पॉवर जिममध्ये राजा चंद्रभान टेंभेकर (वय ३२, रा. बौद्ध विहाराजवळ मुर्री), आकाश आनंद भालेकर (२४, रा. लिचडे यांच्या दुकानाजवळ चंद्रशेखर वॉर्ड श्रीनगर गोंदिया), कुणाल महानंद शहारे (२०, रा. बौद्ध विहाराजवळ मुर्री), राजा बाकीलाल परिहार (१९, रा. झाशी तेल घाणीजवळ श्रीनगर गोंदिया) व विकास जयराज तुलकर (३३, रा. पिंडकेपार) या पाच तरुणांनी विनामास्क शासनाने निर्धारित करून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ जिम सुरू ठेवली. ही जीम नंदू कटारिया (रा. गोल्ड टॉकीजजवळ छोटा गोंदिया) यांच्या मालकीची आहे. या सहाजणांवर गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम १८८, २६९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
विनामास्क जीम मारत असणाऱ्या सहाजणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 4:30 AM