आॅनलाईन लोकमतगोंदिया : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण-२०१८ ला सोमवारपासून (दि.२६) सुरूवात झाली. यांतर्गत केंद्रीय समितीतील एका सदस्याचे आगमन झाले. त्यांनी नगर परिषदेने शहरात केलेल्या स्वच्छता विषयक कामांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली. आता हे सदस्य गेल्यानंतर प्रत्यक्ष पाहणीसाठी समितीतील दुसरे सदस्य येणार असल्याची माहिती आहे.स्वच्छता सर्वेक्षणाला घेऊन नगर परिषदेची मागील काही दिवसांपासून चांगलीच धावपळ सुरू आहे. केंद्रीय समितीकडून करण्यात येणारे हे सर्वेक्षण अंतीम सर्वेक्षण असून यावरूनच गोंदिया शहराची रँकींग ठरविली जाणार आहे.यामुळे नगर परिषद कामाला लागली असून शहरात स्वच्छता विषयक कामांनी जोर धरला आहे.स्वच्छता अभियानांतर्गत निकषांना धरून तसेच आलेल्या मार्गदर्शकांच्या सुचनांवरून स्वच्छतेसाठी आवश्यक ती सर्वच कामे केली जात आहेत. ही सर्व धावपळ सुरू होती ती केंद्रीय समितीचे आगमन होणार यासाठीच. त्यानुसार, सोमवारी (दि.२६) केंद्रीय समितीतील सदस्य राकेश यांचे आगमन झाले. ते नगर परिषदेने शहरात केलेल्या स्वच्छता विषयक कामांच्या कागदपत्रांची पाहणी करणार आहेत.मंगळवारीही ते नगर परिषदेच्या कागदपत्रांची पाहणी करणार आहेत.त्यानंतर शहरातील विविध ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी समितीतील अन्य सदस्य येणार आहेत. हे सदस्य आल्यानंतर खºया अर्थाने स्वच्छता सर्वेक्षणाला सुरूवात होणार आहे.अधिकारी-कर्मचाºयांची धावपळमागील वर्षी ३४३ व्या क्रमांकावर असलेल्या गोंदिया शहराला यंदा टॉप-५ च्या आत आणण्यासाठी नगर परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र एक करून धावपळ करीत आहेत. सुटीच्या दिवशीही नगर परिषद कार्यालय सुरू ठेवून केवळ सफाई विभागातीलच नव्हे तर अन्य विभागातील कर्मचारीही काम करीत असताना दिसले. स्वच्छता सर्वेक्षणाला घेऊन नगर परिषद अधिकारी-कर्मचाºयांची चांगलीच धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.
स्वच्छता विषयक कागदपत्रांची तपासणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:15 AM
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण-२०१८ ला सोमवारपासून (दि.२६) सुरूवात झाली. यांतर्गत केंद्रीय समितीतील एका सदस्याचे आगमन झाले. त्यांनी नगर परिषदेने शहरात केलेल्या स्वच्छता विषयक कामांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली.
ठळक मुद्देस्वच्छता सर्वेक्षणाला सुरूवात : एका सदस्यांचे झाले आगमन