गोंदिया: वडीलाने मुलाला फुकनीने मारून खुनाचा प्रयत्न केला. या प्रकरणात न्यायालयात सुनावणी दरम्यान पहिल्यांदा न्यायालयासमोर उत्तम साक्ष दिली. परंतु आरोपीच्या वकीलाने क्रॉस व्हेरिफिकेशन केले तेव्हा जखमी हा फितूर झाला आणि त्याने न्यायालयात आपली साक्ष फिरविल्याने वडीलाला सीआरपीसी २३५ (१) नुसार आरोपीस निर्दोषमुक्त केले. परंतु ज्या मुलाने तक्रार केली त्या मुलाविरूध्द न्यायालयाने कारवाई सुरू केली आहे.
दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या विजयटोला येथील आरोपी बळीराम पांडू वाघाडे (६१) याने आपला मुलगा अशोक बळीराम वाघाडे याला लोखंडी फुकणीने मारून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. आरोपी बळीराम जनावरे चारण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. एके दिवशी आरोपी बळीराने अशोक याला जनावरांचे पैसे गोळा करून आणण्यास सांगितले होते. परंतु अशोकने पैसे गोळा करून आणले नाही. त्या गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने मुलाला लोखंडी फुकणीने मारून गंभीर जखमी केले होते. त्यावरून दवनीवाडा पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जाधव यांनी केला होता. आरोपी विरूद्ध सबळ साक्ष पुरावे गोळा करून गुन्ह्याचा दोषारोपपत्र प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायालय गोंदिया यांच्या न्यायालयात सादर करण्यात आला होता. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायालय गोंदिया यांच्या न्यायालयात सदर खटल्याचे सुनावणीत अशोक याने न्यायालयात समक्ष सदर केसच्या सुनावणी दरम्यान सरकार तर्फे उत्तम साक्ष दिली. आरोपीचे वकील यांनी क्रॉस व्हेरिफिकेशन केले तेव्हा अशोक याने न्यायालयासमोर खोटी साक्ष दिली. यामुळे याचा फायदा आरोपीला झाला.ही केली कारवाई सुरूअशोक वाघाडे हा फितूर झाल्याने सीआरपीसी २३५ (१) नुसार आरोपीस निर्दोषमुक्त केले. अशोक वाघाडे न्यायालयासमोर फितूर झाल्याने सरकारी वकील सतीश घोडे यांनी त्याच्याविरुद्ध कलम भादंविच्या कलम १९३ अन्वये खोटी साक्ष दिल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.तक्रारकर्ते, पंच, साक्षदारांनो फितूर होऊ नका अन्यथा होणार कारवाईन्यायालयासमोर खोटी साक्ष दिल्यास झाल्यास न्यायालयीन प्रक्रिया करून कारवाई होऊ शकते. गोंदिया जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे न्यायालयात चालविण्यात येणाऱ्या खटल्यांमधील फिर्यादी, पंच, साक्षदार यांनी फितूर होऊ नये, अन्यथा खोटी साक्ष दिल्यास आपल्याविरूद्ध कायदेशिर कारवाई होवू शकते याची जाणीव ठेवावी, असे आवाहन पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी केले आहे.