ऑनलाईन लोकमतगोंदिया : प्रत्येक मुल शाळेत जावे यासाठी शासनाने शिक्षणाचा मुलभूत हक्क हा कायदा अमंलात आणला. या कायद्याची दखल घेत गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा येथील विटभट्टीवर काम करणाऱ्या ५ शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यात आले.गोरेगावच्या गटसाधन केंद्रातील विषय साधन व्यक्ती सुनिल ठाकूर हे मोटार सायकलने कामानिमीत्त कवलेवाडावरुन गावाला परत जात असताना रस्त्यात एका महिलेने त्यांना त्यांच्या मोटारसायलवर काही दूरवर येण्याची विनंती केली. त्यांनी त्या महिलेला आपल्या मोटार सायकलवर बसविले. त्यांंनी त्या महिलेला विचारपूस केली असता त्या महिलेने त्या विटभट्यावर शिक्षण घेत नसलेली ८ ते ९ मुले असल्याचे सांगितले. यासंदर्भात ठाकूर यांनी वेळीच कवलेवाडाचे केंद्रप्रमुख राजेश लदरे यांना दुरध्वनीवरून माहिती दिली. केंद्रप्रमुख लदरे, मुख्याध्यापक वैद्य, शिक्षक धपाडे व इतर शिक्षकांनी त्या ठिकाणी जाऊन त्या विटभट्टीवरील शाळाबाह्य मुलांची व त्यांच्या आई-वडीलांची विचारपूस केली. त्या बालकांना शाळेत दाखल करण्यास त्यांच्या पालकांना प्रवृत्त केले. त्या विटभट्टीपासून एक किमी अंतरावर जिल्हा परिषद शाळा कवलेवाडा आहे. या शाळेत पाच मुलांना दाखल करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले. ही मुले छत्तीसगड राज्यातील असल्याचे सांगितले जाते. त्यांचे आई-वडील कवलेवाडा येथील चक्रवती यांच्या विटभट्टीच्या कामावर आल्याने ते त्यांच्यासोबत या विटभट्टीच्या कामावर आले.अभय राजू चेलक वर्ग पहिला, राहूल लाला बंजारे वर्ग दुसरा, मनहरण लाला बंजारे वर्ग दुसरा, बामलेश हिरादास दिवाकर वर्ग तिसरा, इंदू पुरूषोत्तम दिवाकर वर्ग तिसरा या विद्यार्थ्यांना अध्ययनरत साहित्याचे वाटप करण्यात आले.चार दिवसापूर्वी दोन बालके शिक्षणाच्या प्रवाहातगोरेगाव येथील विषयतज्ज्ञ सतीश बावणकर व ओमप्रकाश ठाकरे या दोघांनी चार दिवसापूर्वी संदीप अशोक उईके (१२) रा. मोहला ता. बैहर जि. बालाघाट याला ६ वी तर निकेश अंताराम येल्ले याला वर्ग ७ वीत दाखल करण्यात आले. या दोन्ही मुलांना जीईएस शाळा कवलेवाडा येथे दाखल करण्यात आले.कामगार आयुक्तांनी लक्ष द्यावेगोंदिया जिल्ह्यात सुरू असलेल्या विटभट्टीवर काम करणाºया मजुरांची मुले शाळेत जात नाही. तसेच काही विटभट्टींवर बाल कामगारही काम करतात त्यामुळे कामगार आयुक्तांनी बाल कामगारांना पकडण्याची मोहीम चालविण्याची गरज आहे.
विटभट्टीवरील बाल कामगारांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:17 PM
प्रत्येक मुल शाळेत जावे यासाठी शासनाने शिक्षणाचा मुलभूत हक्क हा कायदा अमंलात आणला. या कायद्याची दखल घेत गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा येथील विटभट्टीवर काम करणाऱ्या ५ शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यात आले.
ठळक मुद्देकवलेवाडा शाळेत केले दाखल : साहित्याचे वाटप