१० मेच्या दुपारी २.३० वाजता गोंदिया तालुक्याच्या मुरपार येथील शेतातील झोपडीत राहणाऱ्या जयप्रकाश बसंतलाल लिल्हारे (४५) याचा चाकूने खूृन करण्यात आला. जयप्रकाश लिल्हारे याचे मागील तीन-चार वर्षांपासून गावातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्या संबंधापोटी त्याने तिला नागपूरला पळवून नेले. तिच्यासोबत त्याने नागपुरात दोन वर्षे काढली. मागील एक वर्षापासून तो मुरपार येथे परतल्यावर गावापासून शंभर ते दोनशे मीटर अंतरावर असलेल्या शेतशिवारात झोपडी करून राहत होता. तो आरोपी कोमल रामचंद्र रणगिरे (३३) व रुपेश रामचंद्र रणगिरे (१९, दोन्ही रा. मुरपार) यांचा छळ करायचा. त्यामुळे त्या दोघांनी चाकूने भोसकून त्याचा खून केला. त्या दोघांना १५ मेपर्यंत पोलीस कोठडी होती. पोलीस कोठडी संपल्याने त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
आईच्या प्रियकराचा खून करणारे मुले गेली तुरुंगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:27 AM