लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्टÑीय स्वदेशी सुरक्षा अभियानांद्वारे रेलटोली येथील रामदेवरा सभागृहात ‘राष्टÑहितात चिनी वस्तूंचा बहिष्कार व आमचे कर्तव्य’ या विषयावर महिला संमेलन पार पडले.वक्त्या म्हणून स्वदेशी जागरण मंचच्या अखिल भारतीय महिला प्रमुख डॉ. अमिता पत्की होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. अलका बहेकार होत्या. पुस्तके देवून अतिथींचे स्वागत संध्या मेठी व धर्मिष्ठा सेंगर यांनी केले.आपल्या मार्गदर्शनात डॉ. पत्की म्हणाल्या, चिनी वस्तूंमुळे कुटुंब, समाज व देशाचे नुकसान होत आहे. जे मालक होते ते आता नोकर झाले आहेत, चीनने त्यांचे रोजगार नष्ट केले आहे. चहुबाजूकडे चिनी वस्तूंची भरमार आहे व आम्ही आपल्याच भारतीयांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी न करता चिनी वस्तूंचा उपभोग करीत आहोत. चिनी वस्तूंचा प्रभाव पर्यावरणावर पडत आहे. सामाजिक कर्तव्य विसरत चाललो आहोत. त्यामुळे चिनी वस्तू ूखरेदी न करण्याचा प्रण घेवून आपल्या देशातच तयार केलेल्या वस्तू खरेदी करा, असे आवाहन त्यांनी केले. तर डॉ. बहेकार यांनी, या दिवाळीत मातीचे दिवे जाळण्याचे आवाहन केले.काही दिवसांपूर्वी गोंदियातील अभियंता झलेस पशिने यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांची पत्नी मनिषा पशिने व मुलगी नेहा पशिने यांनी त्यावेळी धाडसी व प्रेरणादायक निर्णय घेवून झलेश पशिने यांच्या अवयवांचे दान करून ७ जणांचे जीवन वाचविले. या धाडसी कार्याबद्दल त्यांची पत्नी मनिषा व मुलगी नेहा यांचा सदर कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मोठ्या संख्येने शहरातील महिला उपस्थित होत्या. सर्वांनी विदेशी वस्तूंचा बहिष्कार करण्याची राष्टÑभावनेने शपथ घेतली. संचालन डॉ. वंदना अलोनी यांनी केले. आभार डॉ. सुषमा यदुवंशी यांनी मानले. वंदे मारतम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
राष्टÑहितात चिनी वस्तूंचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 9:46 PM
राष्टÑीय स्वदेशी सुरक्षा अभियानांद्वारे रेलटोली येथील रामदेवरा सभागृहात ‘राष्टÑहितात चिनी वस्तूंचा बहिष्कार व आमचे कर्तव्य’ या विषयावर महिला संमेलन पार पडले.
ठळक मुद्देचिनी वस्तूंचा बहिष्कार व आमचे कर्तव्य’ या विषयावर महिला संमेलन