लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : विद्युत करंट लावून चितळाची शिकार करुन मासांची गावात नेवून विक्री करणाऱ्या पाच आरोपींना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.२५) अटक केली. पाचही आरोपींना तिरोडा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पाचही आरोपींना ८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.आरोपींमध्ये बब्बुमिया भुरामिया शेख(६२) कोडेलोहारा, हल्ली मुक्काम कुऱ्हाडी, ता. गोरेगाव, आशिष शिशुपाल मेश्राम (३३) कोयलारी, अंजुम सुखदेव धमगाये (३५) कोडेलोहारा, राजकुमार भाऊदास जनबंधू (५२) बोरगाव, चेतन छगनलाल जनबंधू (३२) बोरगाव यांचा समावेश आहे.आरोपींनी विद्युत कंरट लावून चितळाची शिकार केली. त्यानंतर चितळाच्या मासांची विक्री करून त्याची विल्हेवाट लावली. राजकुमार व चेतन जनबंधू यांच्या घरी चितळाचे मांस शिजवित असल्याची गुप्त माहिती वनविभागाच्या अधिकाºयांना मिळाली. त्यांनी माहितीच्या आधारे शुक्रवारी जनबंधू यांच्या घरी धाड टाकून आरोपींना मांसासह रंगेहाथ पकडले.पाचही आरोपींना पकडून सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध प्रथम सूचना रिपोर्ट क्र. ७१/१४, २५ जानेवारी १९ नुसार वन गुन्हा दाखल केला. आरोपीकडून वापरलेले साहित्य तार, कुऱ्हाड, सुरी, टार्च जप्त करण्यात केले.पशुधन विकास अधिकारी तिरोडा यांच्याकडून शिजलेल्या मांसाचे नमूने व चारवळीचे नमूने सील करुन ते परीक्षणासाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.
चितळाची शिकार करणारे पाच आरोपी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 9:35 PM
विद्युत करंट लावून चितळाची शिकार करुन मासांची गावात नेवून विक्री करणाऱ्या पाच आरोपींना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.२५) अटक केली. पाचही आरोपींना तिरोडा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पाचही आरोपींना ८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ठळक मुद्देवन विभागाची कारवाई : आरोपींना ८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी