लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : ग्राम खांबी येथील प्रादेशिक पाणी पुरवठा नळ योजनेतून परिसरात पाणी पुरवठा केला जातो. मात्र या योजनेचे पाणी मागील ३ दिवसांपासून गढूळ येत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. यामुळे मात्र त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.गेल्या ३-४ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती. त्यामुले सर्वत्र पाणिच पाणी झाले असून याच पावसामुळे ६ किमी. अंतरावरील नवेगावबांध तलावाचे पाणि लाल झाले आहे. खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा नळ योजनेत नवेगावबांध तलावाचे पाणी घेतले जाते. मात्र पाणी गढूळ येत असल्याने त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. योजनेच्या अनेक गावांतील जलकुंभाखाली ठिकाणी हिरवा कचरा उगवला आहे. तसेच गेल्या ६-७ महिन्यांपासून जलकुंभ स्वच्छ करण्यात आले नाही. पाणी स्वच्छ राहावे म्हणून ब्लिचिंग पावडरचा वापरही होत नाही. अशात सामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात दिसत आहे. शुद्ध व पिण्यायोग्य पाणी लवकरात लवकर मिळावे अशी मागणी ग्राम येरंडी, बाराभाटी, बोळदे, कवठा, डोंगरगाव, सुरगाव, कुंभीटोला, सुकळी आदी गावांतील नागरिकांनी केली आहे.सततच्या पावसाने नवेगावबांध तलावाचे पाणि गढूळ झाले. पाणी स्वच्छ व शुद्ध करणे सुरु आहे. लवकरच पाणी चांगले मिळेल. सध्या नागरिकांनी पाणि उकळून प्यावे अशी सूचना दिली आहे.- किशोर तरोणे,अध्यक्ष, खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा नळ योजना, नवेगावबांध
नागरिकांना प्यावे लागते गढूळ पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 5:00 AM
गेल्या ३-४ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती. त्यामुले सर्वत्र पाणिच पाणी झाले असून याच पावसामुळे ६ किमी. अंतरावरील नवेगावबांध तलावाचे पाणि लाल झाले आहे. खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा नळ योजनेत नवेगावबांध तलावाचे पाणी घेतले जाते. मात्र पाणी गढूळ येत असल्याने त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
ठळक मुद्देथांबी पाणी पुरवठा योजना : नागरिकांचे आरोग्य धोक्यात