शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

पुलाच्या मागणीसाठी पिपरटोला, मरारटोला, धानोली गावातील नागरिक बसले उपोषणाला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 3:09 PM

३० ते ४० वर्षे जुना असलेला पूल : पुलावर पाणी असल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पडतो खंड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमगाव तालुक्यात असलेल्या पिपरटोला, मरारटोला, धानोली या गावांना जोडणाऱ्या कुआढास मार्गावरील पूल ४० वर्षांपूर्वी तयार केलेला आहे. या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्याच्या दिवसांत या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

आठ आठ दिवस या नाल्यावर पाणी असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. कामानिमित्त जाणारे मजूर व भाजीपाला विक्रीकरिता जाणाऱ्या मजुरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथे नवीन पूल बांधण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांनी सोमवारपासून (दि.१२) या पुलावरच उपोषणाला सुरुवात केली.

आमगाव तालुक्यात असलेल्या पिपरटोला, मरारटोला, धानोली या गावांना जोडणारा हा पूल कमी उंचीचा आहे. त्यामुळे थोडाही जोराचा पाऊस झाला की या पुलावरून पाणी वाहत असते. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटतो. तर गावकऱ्यांना २५ किमीचा फेरा मारून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे या कुआढास नाल्यावर पूल बांधण्याची मागणी करीत सोमवारपासून (दि.१२) उपोषणाला सुरुवात केली आहे.

आमगाव तालुका आणि सालेकसा तालुक्यालगतच असलेल्या धानोली, पिपरटोला, मरारटोला या गावांना जाण्याकरिता कुआढास नाला वाघ नदीच्या जवळ असल्याने ह्या नाल्यावर पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. त्यामुळे गेल्या ३० वर्षांपासून येथील नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे.

अनेक विद्यार्थ्यांना माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता ह्या नाल्यावर पाणी असल्याने अनेक दिवस शाळेत जाण्यापासून वंचित राहावे लागते. ये- जा करणाऱ्या नागरिकांना आणि मजुरांना तसेच लहान व्यावसायिकांना सुद्धा या नाल्यावर पाणी असल्यामुळे २५ किलोमीटरचा लांब फेरा करून तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करावी लागते. त्यामुळे या मार्गावर पूल तयार करण्याची मागणी केली आहे.

प्रशासनाचे होतेय दुर्लक्षकुआढास मार्गावरील पूल तयार करण्याच्या मागणीसाठी यापूर्वी अनेकदा आंदोलन केले. पण त्याची शासन आणि प्रशासनाने दखल घेतली नाही. यालाच कंटाळून येथील शालेय विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनी सोमवारपासून (दि.१२) आमरण उपोषण सुरू केले. जोपर्यंत शासन पुलाची मागणी पूर्ण करीत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा प्रहार संघटना व येथील नागरिकांनी दिला आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया