शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

शहरातील वाहतुकीची कोंडी सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 10:03 PM

शहरातील अरुंद रस्ते आणि त्यावर वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे वाहतुक व्यवस्थेचा पार बोजवारा उडाला होता. वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनचालकांसह पायी चालणारे नागरिक सुध्दा त्रस्त झाले होते.

ठळक मुद्देपोलीस प्रशासनाने घेतली दखल : नो पार्किंग झोनमध्ये जड वाहनाना प्रवेश बंदी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील अरुंद रस्ते आणि त्यावर वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे वाहतुक व्यवस्थेचा पार बोजवारा उडाला होता. वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनचालकांसह पायी चालणारे नागरिक सुध्दा त्रस्त झाले होते. यासर्व गोष्टींची जाणीेव उशीरा का होईना पोलीस प्रशासनाला झाली. त्यामुळे वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना राबविण्यास सुरूवात केली आहे. यासाठी नागपूर शहरातील फार्मुला वापरला जाणार असल्याची माहिती आहे.शहराच्या मध्यभागी भाजीबाजार व प्रमुख बाजारपेठ असल्याने त्या भागात दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. औद्योगिक विकासामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातुलनेत रस्ते मात्र अरुंद व जुनेच आहे. मुख्य बाजारपेठेत जड वाहने, माल वाहतुक वाहने, चारचाकी वाहने, दुचाकी वाहने, हातठेले, रिक्षा ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र सहज पाहयला मिळते. सामान्य जनतेला यामुळे होणारी अडचण व सुरक्षीततेच्या दृष्टीने वाहतुकीची कोंडी आणि पार्किंगचा समस्या मार्गी लावण्याची गरज होती.पोलीस विभागाने शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी यासाठी एक अधिसूचना देखील काढली आहे. शहरातील सर्व बसस्थानके व बसथांबे यांच्या प्रवेशद्वारापासून २०० मीटर अंतरावर अवैध प्रवासी वाहतुक करणाºया वाहनांसाठी नो पार्र्कींग झोन क्षेत्र कायम ठेवले आहे.जयस्तंभ चौक ते रेल्वे क्रॉसींग मरारटोली या राज्य महामार्गावरील तसेच जयस्तंभ चौक ते फुलचूर नाका या राज्य महामार्गावरील दोन्ही बाजूस जड मालवाहतूक वाहनांसाठी जाहीर केलेले नो पार्र्कींग झोन यापुढेही कायम राहील.जड वाहनांना प्रवेश बंदी, चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी, दुचाकी वाहनांसाठी सम-विषम तारखांना पार्र्कींग दुचाकी वाहनांसाठी वन साईड पार्र्कींग, जड वाहनांसाठी पार्र्कींग झोन, चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी पार्र्कींग झोनसाठी वाहतुक नियमावली निश्चित केली आहे.सम-विषम पार्किंग सुविधानागपूर शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सम विषम पार्र्कींग व्यवस्थेचा उपक्रम राबविण्यात आला. यामुळे बºयाच प्रमाणात वाहतुक व्यवस्थेत सुधारणा करण्यास मदत झाली. तोच प्रयोग आता गोंदिया शहरात राबविण्यात येणार आहे. दुचाकी वाहनांसाठी सम-विषम तारखांना पार्र्कींगची व्यवस्था निश्चित केली आहे. रस्ता क्र .१२ : गांधी प्रतिमा-गोरेलाल चौक या मार्गावर सम तारखेस पूर्व बाजूस पार्र्कींग, विषम तारखेस पश्चिम बाजूस पार्र्कींग, रस्ता क्र .१३ : गोरेलाल चौक-ख्वाजा मस्जीद या मार्गावर सम तारखेस उत्तर बाजूस पार्र्कींग व विषम तारखेस दक्षिण बाजूस पार्र्कींग, रस्ता क्र .१४ : गोरेलाल चौक-दुर्गा चौक या मार्गावर सम तारखेस उत्तर बाजूस पार्र्कींग-विषम तारखेस दक्षिण बाजूस पार्र्कींग, रस्ता क्र .१५ : श्री टॉकीज-जैन मंदिर-फर्निचर दुकान या मार्गावर सम तारखेस पूर्व बाजूस पार्र्कींग व विषम तारखेस पश्चिम बाजूस पार्र्कींग राहील.या मार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदीसकाळी १० ते रात्री ८ या वेळेत या मार्गावर जड वाहनांना प्रवेश बंदी राहील. रस्ता क्र .१ : गुरु नानक गेट ते गांधी चौक-चांदणी चौक - राजस्थान कन्या विद्यालय पर्यंतचा पूर्व भाग, रस्ता क्र .२ : छत्रपती शिवाजी चौक - गांधी चौक - गोरेलाल चौक -श्री टॉकीज चौक पर्यंतचा दक्षिण उत्तर मार्ग, रस्ता क्र . ३ : महाराणा प्रताप चौक - दीपक ट्रान्सपोर्टकडे जाणारा दक्षिण उत्तर मार्ग, रस्ता क्र . ४ : कृषी उत्पन्न बाजार समिती - चांदणी चौक - दुर्गा चौक - रेल्वे लोखंडी सिडीपर्यंतचा दक्षिण उत्तर मार्ग, रस्ता क्र . ५ : भारतमाता चौक - गोयल चौक - भाजीबाजाराकडे जाणारा पश्चिम पूर्व मार्ग, रस्ता क्र .६ : श्री बाबुजी बजरंगव्यायाम शाळा चौक - मारवाडी चौकपर्यंत जाणारा पश्चिम पूर्व मार्ग, रस्ता क्र .८ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक - सुभाष शाळेकडे जाणारा पूर्व पश्चिम मार्ग, रस्ता क्र .८ : पं.जवाहरलाल नेहरु चौक - दुर्गा चौकपर्यंत जाणारा पूर्व पश्चिम मार्ग, रस्ता क्र .९ : कुडवा नाका - धोटेबंधू विज्ञान महाविद्यालय- एन.एम.डी.कॉलेज पाल चौकपर्यंत जाणारा उत्तर दक्षिण मार्ग, रस्ता क्र .९ अ : शक्ती चौक-गुरु द्वारा गुजराती हायस्कूल पाल चौकपर्यंत जाणारा पूर्व पश्चिम मार्ग या मार्गावर जड वाहनांना प्रवेश बंदी राहील.जड वाहनासाठी मार्ग निश्चितजड वाहनांना ये-जा करण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये गुरु नानक गेट-मोदी पेट्रोलपंप-शिवाजी चौक-महाराणा प्रताप चौक-कृषी उत्पन्न बाजार समिती-सिंधी हायस्कूल-एफसीआयकडे जाणारा पूर्व पश्चिम मार्ग आणि कुडवा नाका-अवंती चौक रेल्वे क्र ॉसींग-मरारटोली चौक-शक्ती चौक-रेल्वे स्टेशन-रेल्वे मालधक्का या मार्गाचा समावेश आहे.