गोंदिया : देवरी तालुक्याच्या शिलापूर येथे पावसाळ्यापूर्वी विहिरींचा गाळ काढून नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेतला. गट ग्रामपंचायत शिलापूर अंतर्गत शिलापूर येथील वार्ड क्रमांक ३ येथील बजरंग चौकातील शासकीय विहिरीचे गाळ काढण्यात आले. बजरंग चौकातील नागरिकांच्या मागणीवरून या विहिरीतील गाळ काढण्यात आला. मागील ३५ ते ४० वर्षांपासून या विहिरीचे गाळ काढण्यात आले नव्हते. त्यामुळे मागील दोन वर्षांपूर्वी या विहिरीतील पाणी दूषित झाले होते. दूषित पाण्यामुळे झालेल्या आजारामुळे आरोग्य यंत्रणेला शिलापूर येथे दहा दिवसांचे शिबिर घ्यावे लागले. या दूषित पाण्याचे विल्हेवाट लावण्यात आली नव्हती. विहिरीची स्वच्छता करण्यात आली नव्हती. तीन वर्षांपासून या विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नव्हते. परंतु, सरपंच गरिबा टेंभूरकर यांनी यातील महिन्याच्या काळात वार्ड क्रमांक ३ मधील दूषित विहिरीचे गाळ काढून स्वच्छता केली. या कामासाठी सरपंच गरिबा टेंभूरकर, सचिव जी. जी. मुनेश्वर, उपसरपंच सरपंच रविना कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य नरेश राऊत, अनिता भोयर, सुनील भोयर, वनिता मेंढे, गीता मानकर, सीता भोयर, अरुण काळसर्पे, ग्रामपंचायत कर्मचारी अनुप रहिले, नरेंद्र टेंभूरकर यांनी सहकार्य केले.
शिलापूर येथील शासकीय विहिरींची स्वच्छता मोहीम ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:20 AM