शहरं
Join us  
Trending Stories
1
BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा?
2
नांदेड शहर आणि परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के, जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राची माहिती
3
मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?
4
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
5
मिका सिंगने कॉन्सर्टदरम्यान सलमानला धमकी देणाऱ्यांची केली बोलती बंद! म्हणाला- "भाई तू..."
6
उमेदवार यादीआधीच १७ जणांना एबी फॉर्म; अजित पवार गट उद्या जाहीर करणार यादी
7
१७० खोल्यांचं घर, ₹२०००० कोटींची संपत्ती; कोण आहेत जगातील सर्वात मोठ्या घराचे मालक समरजीतसिंह गायकवाड
8
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
9
मनसेला महायुतीचा पाठिंबा मिळण्याची चर्चा; मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सारेच प्रयत्नशील
10
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
11
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
12
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
13
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
14
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
15
महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?
16
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
17
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
18
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
19
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
20
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

नाल्यांची स्वच्छता रखडली

By admin | Published: June 20, 2015 1:41 AM

मागील चार दिवसांपासून परिसरात चांगले पाऊस येत आहे. गावातील पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्याही बनविल्या आहेत.

खातिया : मागील चार दिवसांपासून परिसरात चांगले पाऊस येत आहे. गावातील पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्याही बनविल्या आहेत. मात्र नाल्यांची स्वच्छता अद्याप करण्यात न आल्याने नाल्यांतील पाणी मध्येच थांबून असते. त्यामुळे घरांच्या भिंती कमजोर होत आहेत. ही समस्या गोंदिया तालुक्यातील खातिया, बिर्सी व अर्जुनी गावांत दिसून येत आहे.पाऊस येण्यापूर्वी गावातील नाल्यांची सफाई करण्याचे शासनाचे निर्देश असतात. तसेच नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी पावसाळ्यापूर्वीच नाल्यांची स्वच्छता करणे गरजेचे असते. परंतु खातिया येथे या बाबींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. नाल्यांच्या स्वच्छतेअभावी पाणी एकाच ठिकाणी थांबून असते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात होत आहे व विहिरींचे पाणीसुद्धा दूषित होत आहे. त्यामुळे बोअरवेल्सच्या पाण्याचा वापर केला जात आहे. गावातील एक बोअरवेल दीड महिन्यापासून बंद पडली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दुसरीकडे धाव घ्यावी लागत आहे.पावसाळ्यात अनेक आजार पसरण्याची शक्यता अधिक असते. संबंधित प्रशासनाने नाल्यांच्या स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. २२ व २३ जूनला जोरदार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता करण्यात यावी व बंद पडलेल्या बोअरवेलची सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी खातियावासियांनी केली आहे. (वार्ताहर)