गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे गोंदिया स्थानकातील अधिकारी-कर्मचारी व संत निरंकारी चेरिटेबल संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे स्थानकाच्या विविध परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने रेल्वेचे अप्पर मुख्य चिकित्सा अधीक्षक गोंदिया, सहायक वाणिज्य व्यवस्थापक नागपूर, स्थानक व्यवस्थापक गोंदिया, सर्व निरीक्षक तसेच संस्थेचे समन्वयक किशन तोलानी व श्याम प्रभ्यानी उपस्थित होते. स्वच्छता अभियानात संस्थेचे जवळपास २२० कार्यकर्ते सहभागी झाले होते. रेल्वे स्थानकात ठिकठिकाणी असलेला केरकचरा साफ करण्यात आला. रेल्वे स्थानकाच्या ज्या परिसरात स्वच्छता कार्य करण्यात आले त्यामध्ये सर्कुलेटिंग क्षेत्रातील खिडकी, ग्रिल व बुकिंग काऊंटर, एटीव्हीम मशीन, फर्श, मागील बोर्ड व भिंत, स्थानकातील जाळे व पानडागांची स्वच्छता, सर्व वॉटर बुथची स्वच्छता, सर्व डस्टबीनची स्वच्छता, प्लॅटफॉर्म-१ वर ग्रेनाईडची स्वच्छता, पोल व पिलरची स्वच्छता, फलाटांच्या भूतळाची स्वच्छता, डिस्प्ले बोर्डची स्वच्छता, ब्रिजवरील पानडाग, जाळे व पायऱ्यांची स्वच्छता, सर्व दरवाजे व खिडक्यांची स्वच्छता तसेच प्लॅटफॉर्म-१ च्या बाजूला असलेल्या खुल्या क्षेत्राची स्वच्छता करण्यात आली. (प्रतिनिधी)
रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियान
By admin | Published: March 02, 2017 12:15 AM