शहरं
Join us  
Trending Stories
1
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
3
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
4
अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक
5
WhatsApp चं अप्रतिम फीचर! आता व्हॉईस नोट्स टेक्स्टमध्ये बदलता येणार; जाणून घ्या, कसं?
6
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
7
IPL 2025 कधीपासून सुरु होणार? BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा करून टाकल्या जाहीर
8
Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट
9
निकालांआधीच मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू; महायुती, मविआमधील या  नेत्यांची नावं चर्चेत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
11
Vikrant Massey : "ते टीव्ही स्टार्सला कमी लेखतात"; विक्रांत मेस्सीने इंडस्ट्रीतील मोठ्या स्टार्सची केली पोलखोल
12
१० मोठ्या मालमत्ताधारकांकडे ६०० कोटी रुपयांची थकबाकी; BMC ने दिला इशारा
13
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
14
धनुष-नयनतारा आमने सामने! ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन सुरु आहे वाद; एकाच रांगेत बसले अन्...
15
IND vs AUS : अवघ्या १५० धावांत टीम इंडिया All Out; पदार्पणात Nitish Reddy ची लक्षवेधी खेळी
16
या वीकेंडला OTT वर बघायला मिळेल सिनेमा अन् वेबसीरिजची मेजवानी! वाचा संपूर्ण यादी
17
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी
18
कोण आहेत सागर अदानी? ज्यांच्यावर लाचखोरीचा झालाय आरोप; मिळालीये मोठी जबाबदारी
19
बंडूकाकांच्या उमेदवारीचा कोणाला लाभ?; मंत्र्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लागले लक्ष
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार

पठाणटोला येथील क्रशर बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 10:16 PM

गोरेगाव तालुक्यातील ग्राम पठाणटोला येथे सुरू असलेले स्टोन क्रशर आता गावात ध्वनी, वायू व जलप्रदुषणाचे कारण ठरत आहे. यामुळे येथील गरीब जनतेच्य आरोग्यावर तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम पडत आहे.

ठळक मुद्देवनविभागाच्या जागेवर अतिक्रमण : पालकमंत्र्यांसह अधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनिंबा-तेढा : गोरेगाव तालुक्यातील ग्राम पठाणटोला येथे सुरू असलेले स्टोन क्रशर आता गावात ध्वनी, वायू व जलप्रदुषणाचे कारण ठरत आहे. यामुळे येथील गरीब जनतेच्य आरोग्यावर तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम पडत आहे. यावर गावकरी व प्राथमिक शाळेकडून हे क्रशर बंद करण्याची मागणी केली जात असून पालकमंत्र्यांसह अन्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.हे स्टोन क्रशर राकेश ईश्वरदास अग्रवाल (रा.गोंदिया) यांच्य मालकीचे असून गावापासून फक्त २०० मीटर अंतरावर आहे. क्रशर रात्रंदिवस सुरू राहत असल्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात आवाज व धूर येतो. आवाजामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविणे अवघड झाले आहे. शिवाय जे विद्यार्थी बाहेरगावी शिक्षणाला जातात त्यांना रात्री अभ्यास करणे कठीण झाले आहे. तर धुरामुळे गावातील लोकांचे जिवन जगणे असहनिय झाले आहे.क्रशर गावातील तळे व शेतीला लागून असल्यामुळे तळ््यातील पाण्यावर धूळ साचत असून पाणी दुषीत होत आहे. अशात तळ््यातील पाणी प्राशन केल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. शेतात धूळ जात असल्याने धुराचे थर तयार होऊन शेती दिवसेंदिवस नापिक होत असल्याचे निवेदनात नमूद आहे. या क्रशरची जागा ०.५० हेआर आहे. माज्ञ क्रशर मालल क्रशरसाठी लागणारा कच्चा व पक्का माल वन विभागाच्या सुमारे ०.८० हेआर जागेत ठेवत आहे. असे असतानाही वन विभागाकडून काहीच कारवाई केली जात नसल्याने शंका व्यक्त केली जात आहे. यात मात्र गावकऱ्यांना गुरे चारण्यास अडचण होत आहे. त्याचप्रकारे तळ््यातील अधिकचे पाणी निघण्याच्या जागेवर क्रशर मालकाने अतिक्रमण केल्यामुळे ते पाणी आता शेतातून जात असून त्यामुळे पिकांची नासाडी होत आहे. क्रशरमधील जड वाहनांमुळे गावातील रस्त्यांची दुर्गत झाली आहे. त्यातही क्रशर मालक रॉयल्टी पेक्षा जास्त खनिजाची विक्री करीत असल्याचे समजते. त्यामुळे हे क्रशर बंद करावे अशी मागणी गावकरी व जिल्हा परिषद शाळेतील मुख्याधिकाऱ्यांनी केली आहे.अन्यथा अधिकारीच राहतील जबाबदारक्रशर बंद करून गावकऱ्यांच्या जिवनाशी खेळणे थांबविण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली असून यासाठी पालकमंत्री राजकुमार बडोले, तहसीलदार, खनिकर्म विभाग व गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. विशेष म्हणजे, क्रशर बंद न केल्यास भविष्यात होणाऱ्या हानिला मंजुरी देणारे अधिकारीच जबाबदार राहतील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोलेTahasildarतहसीलदार