आॅनलाईन लोकमतगोंदिया : बाराभाटी जवळील संपूर्ण परिसरात लोकांचे बाहेर शौचास सुरूच आहे. गुडमॉर्निंग पथक फक्त हार-पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात व्यस्त आहेत, पण त्यांची समस्या सोडवत नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच ग्रामीण भागात शासनाची हागणदारीमुक्त मोहीम अपयशी ठरल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात अनेक दिवसांपासून गुडमॉर्निंग पथकाच्या भेटी सुरू आहेत. उघड्यावर बसणाऱ्यांचे स्वागत केले जाते. पण उघड्यावर बसण्याची समस्या का निर्माण झाली. याची कारणे शोधण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सर्वांना शौचालय देवू, असे अनेक मंचावरुन ग्रामीण भागात पंचायत समितीचे अधिकारी, पदाधिकारी लोकांना मोठ्याने सांगतात. यादी मागविली जाते. परंतु त्या यादीमध्ये घोळ केला जातो. असे अनेक प्रकार जिल्ह्यात उघडकीस आले आहे. एकाच लाभार्थ्याला २-३ शौचालचा लाभ दिला जातो. त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. गरजुंना मात्र उघड्यावरच बसावे लागते. या प्रकाराची दखल घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच पर्याय नसल्याने नागरिक उघड्यावरच शौचास जात असल्याचे चित्र आहे. शासनातर्फे लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र त्याची अंमलबजावणी करणारे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे योग्य लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नाही.त्यामुळे कोणत्याही प्रकाराला आणि अडचणीला सामान्य नागरिकच बळी पडतो. हागणदारीमुक्त मोहिमेकडे जातीने लक्ष दिले तर अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येतील.काही ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकारी हे ग्रामसेवकांच्या मदतीने योजना स्वत:च्या घशात घालतात. योजनांचे पैसे स्वत: मिळवितात. ग्रामपंचायतच्या कामांचे कंत्राट स्वत:च पदाधिकारी घेवून भ्रष्टाचार करतात. अशाप्रकारे सुविधा मिळविण्याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष अधिक असते. त्यामुळे विकासाची बाजू ढासळत आहे. याकडे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. गाव हागणदारीमुक्त करण्याची मोहीम ग्रामीण भागात अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दिल्याशिवाय या योजनेचा मुळ उद्देश सिध्द होणार नाही.
गोंदिया जिल्ह्यात हागणदारीमुक्त मोहीम अपयशी; उघड्यावर शौचास जाणे सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 11:31 AM
बाराभाटी जवळील संपूर्ण परिसरात लोकांचे बाहेर शौचास सुरूच आहे. गुडमॉर्निंग पथक फक्त हार-पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात व्यस्त आहेत, पण त्यांची समस्या सोडवत नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच ग्रामीण भागात शासनाची हागणदारीमुक्त मोहीम अपयशी ठरल्याचे चित्र आहे.
ठळक मुद्देयोजनेची पायमल्ली