लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : धार्मिक, ऐतिहासिक पाशर््वभूमी तसेच विदर्भात सर्वदूर प्रसिध्द असलेल्या प्रतापगड येथील शिवमूर्ती जळाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी तालुक्यातील अर्जुनी मोरगाव, नवेगावबांध व केशोरी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथील पहाडावर भगवान शंकराची भव्य मूर्ती आहे. येथे महाशिवरात्रीला भव्य यात्रा भरते. लाखों भाविक भक्तीभावाने दर्शन घेतात. शुक्रवारी ही मूर्ती जळाली असल्याची बातमी कुणीतरी आणली.त्यानंतर क्षणार्धात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.आ. राजकुमार बडोले, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे, डॉ. अविनाश काशिवार, प्रभारी उपविभागीय दंडाधिकारी उषा चौधरी,तहसीलदार विनोद मेश्राम, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी शुक्रवारी घटनास्थळाची पाहणी केली होती. वीज पडून शिवमूर्ती जळाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला होता. शनिवारी बंद पाळण्याचा शिवसेनेने निर्णय घेतला होता. त्यानुसार जनतेने या बंदला उत्स्फूर्त सहभाग दिला.अर्जुनी मोरगाव, नवेगावबांध व केशोरी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.शनिवारी खा. सुनील मेंढे, जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.दरम्यान पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी शुक्रवारी मूर्ती स्थापनेसाठी २० लाख रुपये देण्याची घोषणा केली होती.शनिवारी अर्जुनी मोरगाव येथे आठवडी बाजारशनिवारी अर्जुनी मोरगाव येथे आठवडी बाजार भरतो.बाजारात येणाºया विक्रेत्यांना गावाबाहेरच अडविण्यात आले.त्यामुळे या विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. अर्जुनी नवेगावबांध व केशोरी येथे सर्व शाळा महाविद्यालय व्यावसायिक प्रतिष्ठाने हॉटेल व संपूर्ण बाजारपेठ बंद होती.खासदार निधीतून १० लाख रुपयेभंडारा-गोंदियाचे खा.सुनील मेंढे यांनी जिल्हा नियोजन व सनियंत्रण समितीमधून २० लाख तसेच प्रतापगड तीर्थक्षेत्र विकास कामांकरिता खासदार फंडातून १० लक्ष रु पये देण्याची घोषणा पत्रकारांशी बोलताना केली. प्रतापगड येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत निसर्गाचा कोप की घातपात आहे हे अद्याप कळू शकले नाही. प्राथमिकदृष्टया वीज पडून मूर्ती जळाल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे.अन् जि.प. सदस्या भडकल्यामी या जिल्हा परिषद क्षेत्राची सदस्य आहे. स्वपक्षांचे पदाधिकारी येत असतानाही मला सांगितले जात नाही. आपणही येत असल्याची कल्पना मला दिली नाही. गटबाजी करायची असेल तर नका सांगू, असे खडेबोल जि.प. सदस्य रचना गहाणे यांनी खा.सुनील मेंढे यांना सुनावले. खा.मेंढे हे प्रतापगड येथे पाहणी करण्यासाठी आले असतांना उपस्थित जनसमुदायासमोर गहाणे यांनी खडेबोल सुनावले. त्यांचा रोख मात्र दुसºयावरच असल्याची चर्चा घटनास्थळी होती. यावरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये गटबाजी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान या प्रकारामुळे उपस्थित नागरिक देखील अवाक झाले होते.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 9:54 PM
धार्मिक, ऐतिहासिक पाशर््वभूमी तसेच विदर्भात सर्वदूर प्रसिध्द असलेल्या प्रतापगड येथील शिवमूर्ती जळाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी तालुक्यातील अर्जुनी मोरगाव, नवेगावबांध व केशोरी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
ठळक मुद्देसुनील मेंढे आणि कादंबरी बलकवडे यांनी केली पाहणी । अनेक संघटनांतर्फे निवेदन