नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात जानेवारी महिन्यात राज्यात अव्वल असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आजघडीला २४१ ग्राम पंचायतमध्ये एकही काम सुरू नाहीत. तर ३०५ ग्रामपंचायतमध्ये सुरू असलेल्या कामांवर १९ हजार ५४ लोक काम करीत आहेत. परंतु मागील वर्षी याचवेळी ७० हजार मजुरांच्या हाताला काम होते.जिल्ह्यात ५४६ ग्रामपंचायत आहेत. यातील ३०५ ग्रामपंचायतीत जिल्हा परिषदेतर्फे मनरेगाची १०७२ कामे सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यात सर्वाधिक ८१ ग्रामपंचायतमध्ये १३८ कामे सुरू आहेत. या कामांवर १९६९ मजूर काम करीत आहेत. तिरोडा तालुक्यात ५६ ग्रामपंचायतमध्ये २१७ कामे सुरू आहेत असून ३२५९ मजूर काम करीत आहेत. आमगाव तालुक्यात ३२ ग्रामपंचायतमध्ये १२४ कामे सुरू असून २०१६ मजूर काम करीत आहेत.देवरी तालुक्यात २१ ग्रामपंचायतमध्ये १११ कामे सुरू असून १५९५ मजूर काम करीत आहेत. गोरेगाव तालुक्यात २५ ग्रामपंचायतमध्ये ७२ कामे सुरू असून १४१२ मजूर काम करीत आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यात ३८ ग्राम पंचायतमध्ये १७६ कामे सुरू असून २२१७ मजूर काम करीत आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात २१ ग्रामपंचायतमध्ये ६८ कामे सुरू असून २१९० मजूर काम करीत आहेत. सालेकसा तालुक्यात ३१ ग्रामपंचायतमध्ये १६६ कामे सुरू असून ४३९६ मजूर काम करीत आहेत.तलाव खोलीकरणाच्या ४० कामांवर ९९७२ मजूरजिल्ह्यात सध्या १०७२ कामे सुरू आहेत. यातील सर्वाधीक कामे तलाव खोलीकरणाची असून ४० कामांवर ९९७२ लोकांना काम मिळत आहे. इंदिरा आवास योजनेच्या ६८७ कामांवर २९८०, कालवे व नाला सरळीकरणाच्या १३ कामांवर १७३७, नर्सरीच्या १४७ कामांवर ११७३ लोकांना काम मिळत आहे. याचप्रकारे भातखाचरच्या ५३ कामांवर १०६१ मजूर, पांदण, सिमेंट, मुरुम रस्ता व पूलाच्या ४ कामांवर ८५२, शोषखड्याच्या १९ कामांवर ५७८ मजूर, बकरी व गायीचे गोठे तयार करण्याच्या ५० कामांवर ३७६ मजूर, शौचालयाच्या ४२ कामांवर १६९ तर विहिरींच्या १७ कामांवर १५६ मजुरांना काम देण्यात आले आहे.मागील वर्षीच्या तुलनेत २७.०१ टक्केच मजूरांना काममागील वर्षी याच काळात जिल्ह्यात जिल्हा परिषद अंतर्गत ३८५ ग्रामपंचायतमध्ये १०४२ काम सुरू होते. त्यात ७० हजार ५४० लोकांना काम देण्यात आले होते. परंतु यंदा १०७२ कामांवर फक्त १९ हजार ५४ म्हणजे २७.०१ टक्के लोकांनाच काम देण्यात आले आहे ही जिल्ह्याची शोकांतिका आहे.
रोजगारहमीचे २४१ ग्रामपंचायतींमधील काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:42 PM
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात जानेवारी महिन्यात राज्यात अव्वल असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आजघडीला २४१ ग्राम पंचायतमध्ये एकही काम सुरू नाहीत. तर ३०५ ग्रामपंचायतमध्ये सुरू असलेल्या कामांवर १९ हजार ५४ लोक काम करीत आहेत.
ठळक मुद्देयोजना थंडावली : फक्त १९ हजार लोकांना काम, मागीलवर्षीच्या तुलनेत मजूर कमी