शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
2
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
3
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
4
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
5
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
6
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
7
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
8
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
9
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
10
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
11
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
12
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
13
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
14
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
15
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
16
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
17
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
18
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
19
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
20
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच

धान खरेदीवर सहकारी संस्थाचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 12:43 AM

दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करुन धान खरेदी केली जाते. आदिवासी क्षेत्रात धान खरेदी करणाऱ्या आदिवासी विविध सहकारी संस्थाना अद्यापही कमिशन देण्यात आले नाही.

ठळक मुद्देआदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचा निर्धार : शासनाकडे थकले कमिशन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करुन धान खरेदी केली जाते. आदिवासी क्षेत्रात धान खरेदी करणाऱ्या आदिवासी विविध सहकारी संस्थाना अद्यापही कमिशन देण्यात आले नाही. कमिशनची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे.मात्र शासनाकडे याकडे दुर्लक्ष केल्याने यंदाच्या खरीप हंगामात धान खरेदी न करण्याचा निर्णय आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी घेतला आहे.आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचा संघ मर्या. गोंदियाची आमसभा गुरूवारी (दि.४) येथील मॉ धुकेश्वरी मंदिराच्या सभागृहात जिल्हाध्यक्ष शंकर मडावी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात महाराष्ट्र शासनाने महाराष्टÑ ट्रायबल इॅकानॉमीक कंडीशन अ‍ॅक्ट नुसार आदिवासी क्षेत्रातील शेत मालाची व किरकोळ वनोपजांची खरेदी विक्री व व्यापार करण्यासाठी महाराष्टÑ राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाला मुख्य प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले आहे. तर महामंडळाने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांना सब एजेंट म्हणून नियुक्त केले आहे.या अंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी धान खरेदी करतात. मात्र महांमडळाकडून खरेदी केलेल्या धानाची वेळेची उचल करण्यास उशीर केला जातो.परिणामी धानात तुटीचे प्रमाण वाढते. त्यामुळे संस्थेला आर्थिक फटका बसतो. महांमडळाकडे धान खरेदीचे कमिशन मागील अनेक वर्षांपासून थकीत आहे. यासाठी महामंडळाकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला.मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आदिवासी सहकारी संस्थानी २०१८-१९ या वर्षात धान खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतरही शासनाने दखल न घेतल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा शंकर मडावी, उपाध्यक्ष मणिकबापू आचले, सचिव हरिशचंद्र कोहळे, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग अंभोरा, भाष्कर धरमशहारे,जागेश्वर धनगाते, तुलाराम मारगाये, रमेश ताराम, कृपासागर गोपाले, प्रमोद संगीडवार, सुकचंद राऊत, राजेश राऊत, रमेश इळपाते, फगनू कल्लो, संताराम भोयर यांनी दिला आहे.दरम्यान शासन यावर काय तोडगा काढते याकडे जिल्ह्यातील शेतकºयांचे लक्ष लागले आहे.