लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विदर्भात पूर्वी सहकार चळवळ बळकट होती. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत झाली. ग्रामीण भागात सहकार तत्त्वावर विविध उद्योग धंदे स्थापन करुन ही चळवळ बळकट करण्याची गरज आहे. यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. लोकांच्या सहभागातून सहकार समृद्ध होऊ शकते, असे प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी गुरूवारी (दि.२६) रोजी येथे केले.पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी निमित्त जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया व ग्रामीण सहकार भारती प्रकोष्ठ महाराष्ट्र यांच्या सयुक्त विद्यमाने गुरूवारी (दि.२६) कटंगी येथील मयुर लॉन येथे सहकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले होते.प्रमुख पाहुणे म्हणूून महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, सहकार भारती प्रकोष्ठ अध्यक्ष डॉ. मुकुंदराव तपकिर, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आ. केशवराव मानकर, भैरिसंग नागपूरे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन मुंबईचे कार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष राधेश्याम अग्रवाल, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महासचिव विनय खटावकर, अटल महापणन विकास अभियान प्रमुख गणेश शिंदे उपस्थित होते. देशमुख म्हणाले, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. केवळ शेतीतून शेतकºयांचा विकास शक्य नाही. जोपर्यंत शेतकरी शेतीपूरक व्यवसाय करणार नाही, तोपर्यंत त्यांचा आर्थिक विकास शक्य नाही.यासाठी ग्रामीण भागात असलेल्या विविध कार्यकारी व सेवा सहकारी संस्थाचे बळकटी करणे गरजेचे आहे. सहकारी तत्त्वावर गावात छोटे मोठे उद्योग धंदे सुरू केल्यास रोजगार निर्मितीस मदत होईल. सहकार क्षेत्रात कार्यरत लोकांनी सामाजिक बांधिलकी आणि त्यागवृत्ती बाळगण्याची गरज आहे. सहकार क्षेत्र समृध्द झाल्यास विदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबतील. जिल्ह्यात सहकार क्षेत्र बळकट करुन ग्रामीण भागाचा विकास करणार असल्याचे बडोले यांनी सांगितले. सहकार परिषदेला शेतकरी व सहकारी संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.राईस मिलला पुनरुज्जीवित करणारगोंदिया जिल्ह्यात सहकार तत्वावर आठ राईस मिल चालविले जात होते. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने ते सर्व डबघाईस येऊन बंद पडले आहेत. बंद पडलेल्या सर्व राईस मिलला पुनरुज्जीवित करुन रोजगाराची संधी निर्माण करुन देण्यात येईल, असे देशमुख यांनी सांगितले.शेतकरी पुत्र म्हणविणाºयांनी काय केले?जिल्ह्यातील शेतकरी पुत्र म्हणून मिरविणाºया नेत्यांनी प्रत्येक्षात शेतकºयांसाठी मात्र काहीच केले नाही. शेतकºयांच्या हितासाठी ते एक साखर कारखाना सुध्दा उभारु शकले नाही, ही दुर्देवाची बाब आहे. अशी टिका पालकमंत्री बडोले यांनी कुणाचेही नाव न घेता केली. त्यामुळे त्यांची ही टिका नेमकी कुणावर होती, याची चर्चा आहे.
ग्रामीण भागातील लोकांच्या सहभागातूनच सहकार समृद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:49 AM
विदर्भात पूर्वी सहकार चळवळ बळकट होती. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत झाली. ग्रामीण भागात सहकार तत्त्वावर विविध उद्योग धंदे स्थापन करुन ही चळवळ बळकट करण्याची गरज आहे.
ठळक मुद्देसुभाष देशमुख : एक दिवसीय सहकार परिषद