लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामीण भागाचा सर्वांगिन विकासासाठी भाजप सरकार कठिब्ध आहे. गावकºयांचे सहकार्य मिळाल्यास या भागाच्या विकासाला गती देण्यास अधिक मदत होईल. असे प्रतिपादन आ.विजय रहांगडाले यांनी येथे आयोजित सभेत केले.तिरोडा तालुक्यातील वडेगाव, बोदा, भजेपार, गोंडमोहाडी, मुंडीकोटा, देवटोला आदी गावांमध्ये विकास कामासंदर्भात सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. रहांगडाले म्हणाले, राज्यात आपली सत्ता असल्याने ४४ वर्षांपासून रखडलेल्या आंबेनाला (निमगाव) जलाशयाच्या कामाला शासनाकडून मंजुरी मिळवून देण्यात यश आले आहे. शेतकºयांच्या हिताकरिता धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. खळबंदा जलाशयात पाणी सोडले जात असून शेतकºयांना सिंचनाची सोय झाली आहे. तिरोडा क्षेत्रातील अनेक गावांत अनेक विकासकामे करण्यात आले. ३५ किमी रस्त्याचे कामे आटोपले. लवकरच बोदलकसा व चोरखमारा जलाशयात धापेवाडा प्रकल्पाचे पाणी सोडण्याकरिता टप्पा-२ चे काम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.गावात विविध योजना आणण्याकरिता व त्या योग्यरित्या राबविण्याकरिता गावांतील जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले.अविकसित गावांना प्रवाहात आणणारदोन वर्षांच्या कार्यकाळ शिल्लक आहे. या कालावधीत तिरोडा शहराला व तिरोडा-गोरेगाव क्षेत्रातील अविकसीत गावांना विकास कामे करुन विकासाच्या प्रवाहात आणण्यास प्राधान्य देणार आहोत. यासाठी प्रत्येक गावाच्या नागरिकांनी सहकार्य करावे व साथ द्यावे. जनतेच्या सहकार्याशिवाय विकास कामांना गती मिळणे शक्य नसल्याचे रहांगडाले यांनी सांगितले.पक्षभेद विसरूनकरणार कामेगावात कोणत्याही पक्षाचे लोक असोत, आपण त्याला महत्व देत नसून गावाचा विकास महत्वाचा आहे. आपण गावात विविध योजना आणून अधिकाधिक विकास करण्याच्या प्रयत्नात आहोत. यासाठी जनतेच्या सहकार्याची गरज आहे. जनतेने पक्षाचा विचार न करता गावाचा विकास कसा करता येईल, याकडे लक्ष द्यावे, असेही आमदार विजय रहांगडाले यांनी सभेत संबोधित केले.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी सहकार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 11:03 PM
ग्रामीण भागाचा सर्वांगिन विकासासाठी भाजप सरकार कठिब्ध आहे. गावकºयांचे सहकार्य मिळाल्यास या भागाच्या विकासाला गती देण्यास अधिक मदत होईल. असे प्रतिपादन आ.विजय रहांगडाले यांनी येथे आयोजित सभेत केले.
ठळक मुद्देविजय रहांगडाले : तालुक्यातील अनेक गावांत साधला संवाद