शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

अंशकालीन कर्मचाऱ्यांचा जीव लागला टांगणीला

By admin | Published: August 07, 2016 12:58 AM

पदविधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना विनाअट अविलंब शासकीय सेवेत समाविष्ट करण्याचे निर्देश मुख्यमंत्रांनी दिले.

रोजगार संचालनालयाची दिरंगाई : आयुक्तांनी मंत्रालयास महितीच पुरविली नाही गोंदिया : पदविधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना विनाअट अविलंब शासकीय सेवेत समाविष्ट करण्याचे निर्देश मुख्यमंत्रांनी दिले. त्यांची आकडेवारी जमा करण्याची जबाबदारी रोजगार, स्वयंरोजगार व कौशल्य विकास संचालनालयास दिली. मात्र दप्तर दिरंगाईमुळे आयुक्तांनी सदर माहितीच मंत्रालयाला न पुरविल्याचा आरोप संघटनेने केला आहे. प्राप्त माहितीनुसार, पदविधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना धोरणात्मक निर्णयानुसार विनाअट अविलंब शासकीय सेवेत समाविष्ट करण्यासाठी ७ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बैठक घेवून विविध विभागांना निर्देश दिले. त्यात पदविधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची आकडेवारी (डाटा बेस) जमा करण्याची जबाबदारी रोजगार, स्वयंरोजगार व कौशल्य विकास संचालनालयाला दिली. संचालनालयाने १८ जुलै रोजी अंशकालीन कर्मचाऱ्यांना माहिती मागितली. ती माहिती तात्काळ मंत्रालयात जमा करावयाची होती. मंत्रालयाने संचालनालयाला दोनदा स्मरणपत्रे देवून व अनेकदा दुरध्वीवर डाटा बेस मागितला, परंतु आयुक्तांनी अद्यापही डाटा बेस मंत्रालयाला दिला नाही. १ आॅगस्ट रोजी मंत्रालयात रणजित सोमकुंवर व योगेंद्रकुमार मिश्रा यांनी भेट दिली असता सदर बाब उघडकीस आली. त्यामुळे २ आॅगस्ट रोजी संघटनेने राज्यपाल, मुख्यमंत्री यांना निवेदन देवून संबंधित संचालनालयाच्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, डाटा बेसची माहिती मंत्रालयात देवून पदविधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घेण्याचे आदेश निर्गमित करावे, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)