शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
3
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
4
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
5
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
6
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
7
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
8
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
9
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
10
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
11
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
12
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
13
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
14
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
15
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
16
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
17
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
18
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
19
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
20
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!

रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी कलेक्टर ॲक्शन मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 5:00 AM

गोंदिया जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या संख्येतसुद्धा वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचाच फायदा काही मेडिकल चालक घेत असून तुडवडा निर्माण करून अतिरिक्त दाराने त्याची विक्री करीत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. 

ठळक मुद्देमेडिकलला भेट देऊन तपासला डॉटा : स्टॉक उपलब्ध ठेवण्याच्या केल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे. अशा कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण करून त्याची अतिरिक्त दराने विक्री केली जात असल्याची ओरड वाढली आहे. याचीच दखल घेत कलेक्टर, सीईओ, डीएचओ यांनी शुक्रवारी (दि. ९) सकाळीच थेट शहरातील मेडिकल दुकानांमध्ये धडक देत रेमडेसिवीरचा स्टॉक चेक केला. तसेच मेडिकलची पाहणी केली अचानक दिलेल्या भेटीमुळे मेडिकल चालकांमध्ये खळबळ उडाली होती. गोंदिया जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या संख्येतसुद्धा वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचाच फायदा काही मेडिकल चालक घेत असून तुडवडा निर्माण करून अतिरिक्त दाराने त्याची विक्री करीत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता शहरातील जे स्टाॅकिस्ट आहेत त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून ठेवावा, त्याची माहिती वेळोवेळी प्रशासनाला द्यावी यासाठी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता थेट शहरातील मेडिकल दुकानांना भेट देऊन रेमडेसिवीर इंजेक्शन आणि कोरोना संबंधित औषधांचा साठा किती उपलब्ध आहे, याची तपासणी केली. तसेच अतिरिक्त स्टॉक उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देत अतिरिक्त दराने रेमडेसिवीर व इतर औषधांची विक्री केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन मेडिकलच्या दुकानातील संगणकातील स्टॉकचीसुद्धा पाहणी केली. दरम्यान, या धडक मोहिमेमुळे मेडिकल चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. यावेळी त्यांच्यासोबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, डीएचओ डॉ. नितीन कापसे, उपविभागीय अधिकारी वंदना संवरगपते, नगर परिषद मुख्याधिकारी करण चव्हाण यांच्यासह पोलीस अधिकारीसुद्धा उपस्थितीत होते. 

अतिरिक्त दराने विक्री केल्यास थेट तक्रार करा रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी संपूर्ण राज्यभरातच मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार करून लूट केली जात आहे. यासंबंधीच्या तक्रारीतसुद्धा वाढ झाली आहे. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा रेमडेसिवीर इंजेक्शन, मास्क यांची अतिरिक्त दराने विक्री करणाऱ्यांची थेट माझ्याकडे तक्रार करा, असे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी नागरिकांना आवाहन केले. 

काेरोना संसर्गात वेगाने वाढ होत आहे. यामुळे रेमडेसिवीर कोरोनावरील औषधांची मागणी वाढली आहे. पण या संधीचा फायदा घेत औषधांचा काळाबाजार केला जात आहे. मात्र हा प्रकार खपवून घेतला जाणार नसून काळाबाजार करणाऱ्यांची कुठलीही गय केली जाणार नाही, त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल. - दीपक कुमार मीना, जिल्हाधिकारी.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या