शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

जिल्हाधिकारी,सहाय्यक आयुक्त पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 5:00 AM

जिल्हाधिकाऱ्यांना मागील दोन दिवसांपासून सर्दी आणि थोडा खोकला असल्याने सोमवारी त्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाची टेस्ट करुन घेतली. मंगळवारी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या होम आयसोलेटेड झाल्या आहेत. मागील सहा महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असून यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी त्या बैठका आणि जिल्ह्याचे दौरे करीत आहे.

ठळक मुद्देमेडिकलमध्ये ही शिरकाव : अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ, उपाययोजना सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात झपाट्याने वाढत असून यातून आता विविध शासकीय कार्यालय सुध्दा सुटलेले नाही. मंगळवारी (दि.८) जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना सुध्दा कोरोनाची लागण झाल्याचे अहवालानंतर स्पष्ट झाले. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुध्दा कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे दोन्ही कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती.जिल्हाधिकाऱ्यांना मागील दोन दिवसांपासून सर्दी आणि थोडा खोकला असल्याने सोमवारी त्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाची टेस्ट करुन घेतली. मंगळवारी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या होम आयसोलेटेड झाल्या आहेत. मागील सहा महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असून यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी त्या बैठका आणि जिल्ह्याचे दौरे करीत आहे. अशात आता त्याच कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांची जबाबदारी कोण पार पाडणार याकडे लक्ष लागले आहे. पाच दिवसांपूर्वीच अप्पर जिल्हाधिकारी सुध्दा कोरोना पॉझिटिव्ह आले सध्या ते मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत.दरम्यान जिल्हाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सॅनिटायझेशन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सुध्दा करण्यात आल्याची माहिती आहे. समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुध्दा कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवार आणि बुधवारी (दि.९) हे दोन दिवस कार्यालय बंद ठेवून सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना ज्या मेडिकल कॉलेजमध्ये स्वॅब नमुन्यांची तपासणी केली जाते. त्याच प्रयोगशाळेतील ८ टेक्नीशीयन कोरोना पॉझिटिव्ह आले. मेडिकलचे सात डॉक्टर आणि १२ परिचारिकांना सुध्दा कोरोनाची लागण झाली असल्याचे मेडिकलचे अधिष्ठाता व्ही.पी.रुखमोडे यांनी सांगितले.मनुष्यबळाअभावी चाचण्यांवर परिणामजिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.त्यामुळे चाचण्यांकरिता नागरिकांची गर्दी मेडिकलमध्ये वाढत आहे. मात्र या ठिकाणी स्वॅब नमुने तपासणी करण्यासाठी मनुष्यबळाचा अभाव असल्याने अनेकांना चाचणी न करताच परत जावे लागत आहे. या स्वॅब घेणाऱ्यांच कोरोनाची लागण झाली असल्याने केवळ दोन तीन तंत्रज्ञ असून त्यांच्या भरवश्यावर सध्या काम सुरू आहे.त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे.कोरोना बाधितांचा मेडिकलमध्ये मुक्त वावरमेडिकल कॉलेजमध्ये कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणी केले जातात. कोरोना बाधितांचा त्वरीत शोध घेण्यासाठी अँटीजेन टेस्ट केली जात आहे. मात्र बरेच या टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर परत मेडिकल कॉलेजमधील प्रयोगशाळेत स्वॅब तपासणीकरिता येतात. हे पॉझिटिव्ह रुग्ण सुध्दा स्वॅब देण्यासाठी तपासणीसाठी येणाऱ्या इतर रुग्णांसह रांगेत लागतात. त्यामुळे त्यांच्यापासून इतरांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मेडिकलच्या परिसरात मुक्त वावर असल्याने संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या