गोंदिया - दिव्या गुंडे हिने ऑक्टोबर २०२० मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाचीपरीक्षा दिली. त्यानंतर २१ सप्टेंबर २०२१ रोजी दिल्ली येथे मुलाखत घेऊन शुक्रवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने निकाल जाहीर केले. येत्या काही दिवसातच त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत पदस्थापना मिळणार आहे.
प्रशासकीय स्तरावर हे वृत्त कळताच अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी दिव्या गुंडे व जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचे अभिनंदन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, उपविभागीय तहसीलदार आदेश डफड, अप्पर तहसीलदार अनिल खळतकर, मुख्याधिकारी न.प. करण चव्हाण, आकाश चव्हाण, किशोर राठोड व अधिकारी उपस्थित होते.
यशाचे श्रेय आईला
दिव्या गुंडे हिने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याचे श्रेय आई जिल्हाधिकारी नयना गुंडे व बाबा अर्जुन गुंडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. नाशिक यांना दिले आहे. या यशात शिक्षक व मार्गदर्शक यांचा मोलाचा वाटा असल्याचे दिव्याने सांगितले. युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय गोंदियातर्फे तसेच जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी दिव्या व जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचे अभिनंदन केले.