शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मला गोळ्या झाडा मी मरणार नाही, तुम्हाला सोडणार"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
4
“देवेंद्र फडणवीस यांची ही ‘लाडका विनोद’ योजना आहे का?”; काँग्रेसची खोचक टीका
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
7
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
8
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
9
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
10
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
11
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
12
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
13
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
14
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
15
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
16
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
17
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
18
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
19
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप

जिल्हाधिकारी प्रवेशद्वाराला टाळे

By admin | Published: June 07, 2017 12:08 AM

जिल्हाधिकारी प्रवेशद्वाराला टाळे

जलयुक्त शिवारची नवीन कामे सुरू : पाण्याच्या पातळीत वाढ नरेश रहिले । लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सन २०१९ पर्यंत राज्याला दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या तिसऱ्या टप्यात दोन हजार १८६ कामांवर ८७ कोटी ४६ लाख ९९ हजार रूपये खर्च केले जाणार आहेत. जिल्ह्यात सन २०१६-१७ (दुसऱ्या टप्यातील) काम या महिन्याच्या अखेरपर्यंत पुर्ण केले जाणार आहेत. जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्यात (सन २०१६) मध्ये ९४ गावांची निवड करण्यात आली होती. या गावातील चांगली स्थिती पुढे आली आहे. ही सर्व गावे वॉटर न्यूट्रल झाली आहेत. दुसऱ्या टप्यात (सन २०१६-१७) मध्ये ७७ गावांची निवड करण्यात आली. तर तिसऱ्या टप्यात (सन २०१७-१८) मध्ये ६३ गांवांची निवड करण्यात आली. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाची कामे जलद गतीने सुरू आहेत. सन २०१६-१७ चे उद्दीष्ट पुर्ण होण्याच्या मार्गावर असून जिल्ह्यातील ७७ गावात कामे सुरू आहेत. दोन हजार ४४१ कामांपैकी दोन हजार ११ कामे पुर्ण झाली आहेत. यात कृषी विभागाची एक हजार ४१९, जि.प.लघु पाटबंधारे विभागाची ५४, पंचायत समिती १३९, जलसंधारण १२ व वन विभागची ३८७ कामे पुर्ण झाली आहे. तर कृषी विभागाची १६९, लघु पाटबंधारे विभाग (जि.प.) १०७, पंचायत समिती १४, जलसंधारणाची ५ तसेच वन विभागाची १३५ कामे जलद गतीने सुरू आहेत. ही सर्व कामे जून अखेरपर्यंत पुर्ण होणार. गोरेगाव व गोंदिया तालुक्यातील १०-१०, सालेकसा, देवरी व अर्जुनी-मोरगाव प्रत्येकी सात, आमगाव व सडक अर्जुनीच्या प्रत्येकी सहा गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात कृषी विभाग, लघु पाटबंधारे विभाग (जि.प.) व पंचायत समिती ला २७८ काम मंजूर करण्यात आले होते. या कामांवर १४ कोटी १५ लाख ३२ हजार रूपये खर्च करण्यात आले. नवीन प्रस्तावित एक हजार ३९९ कामांवर ५१ कोटी ७६ लाख २३ हजार रूपये खर्च करण्याचे उद्दीष्ट आहे. नवीन प्रस्तावित कामांमध्ये कृषी विभागाच्या ९३८, लघु पाटबंधारे विभाग (जि.प.), जलसंधारण ४७, वन विभागाचे २३४ व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या १६० कामांचा समावेश आहे. दुरूस्तीच्या ५०९ कामांसाठी २१.५५ कोटी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुरूस्तीची ५०९ कामे करण्यात येणार आहेत. या कामांवर २१ कोटी ५५ लाख ४४ हजार रूपये खर्च होणार आहे. यात कृषी विभागाच्या ३२० कामांवर तीन कोटी सहा हजार, लघु पाटबंधारे विभागाच्या (जि.प.) १५३ कामांवर १६ कोटी २७ लाख ६७ हजार तर वन विभागाच्या ३६ कामांवर दोन कोेटी २७ लाख ७१ हजार खर्च करण्यात येतील.