शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
3
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
4
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
5
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
6
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
7
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
8
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
9
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
10
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
11
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
12
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
13
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
14
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
15
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
16
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
17
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
18
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
19
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
20
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!

आओ जाओ घर तुम्हारा ! बसस्थानक, रेल्वे स्थानक, जिल्हा सीमा कुठेच तपासणी नाही : कोरोना रोखणार कसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:28 AM

गोंदिया : मागील दहा ते पंधरा दिवसापासून लगतच्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या जिल्ह्यातील नागरिक बस, रेल्वे ...

गोंदिया : मागील दहा ते पंधरा दिवसापासून लगतच्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या जिल्ह्यातील नागरिक बस, रेल्वे आणि खासगी वाहनाने नियमितपणे ये-जा करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुध्दा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. रेल्वे स्टेशन, बस स्थानकावर सुध्दा नागपूर, पुणे, मुंबई येथून येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात नसून बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची नोंदणी सुध्दा केली जात नसल्याचे चित्र आहे. रेल्वे स्थानकावर पूर्वी थर्मल स्क्रिनिंगसह नावाची नोंदणी केली जात होती. मात्र आता सर्व गोष्टी बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे एखादा कोरोनाग्रस्त रुग्ण सुध्दा सहज येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्याच्या सीमेवर सुध्दा कुठलीच तपासणी केली जात नसून सर्वांसाठी रान मोकळे असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच आओ जाओ घर तुम्हारा असे चित्र आहे. मात्र हा दुर्लक्षितपणा कोरोना वाढीला कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वेळीच पावले उचलण्याची गरज आहे.

.............

वाढत्या संसर्गात काय उपाययोजना केल्या ?

- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात असला तरी बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांमुळे यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे स्थानक, बसस्थानक या ठिकाणी प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग तसेच त्यांचे नाव, पत्ता नोंदविण्याची गरज आहे. मात्र अद्यापही यासंदर्भातील सूचना प्रशासनाने या दोन्ही विभागांना दिलेल्या नाहीत. त्यामुळे बिनधास्तपणे त्यांचा वावर सुरु आहे.

- कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वांना मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. तसेच गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना बंदी घातली आहे. लग्न सोहळ्यासाठी ५० जणांना परवानगी दिली आहे. तर मद्य विक्रीची दुकाने आणि बीअर बार यांना रात्री ८ वाजतापर्यंतच सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे.

- रेल्वे स्थानक, बसस्थानक या मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

...............

कोट

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सर्वच विभागाना कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. रेल्वे स्थानक, बसस्थानक या ठिकाणी सुध्दा आवश्यक ती काळजी घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहे.

- दीपक कुमार मीना, जिल्हाधिकारी गोंदिया.

.................

बस स्थानक

- गोंदिया मरारटोली येथील मुख्य बसस्थानकाला भेट दिली असता नागपूर व इतर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची कसलीच तपासणी अथवा त्यांच्या नावाची नोंदणी केली जात नव्हती.

- बस स्थानकावर अनेक प्रवासी विना मास्क आढळले. तर फिजिकल डिस्टन्सिंगचे सुध्दा कठोरपणे पालन केले जात नसल्याचे आढळले.

- बस स्थानक परिसरात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती करणारे फलक मात्र लागले होते.

.....

रेल्वे स्थानक

- येथील रेल्वे स्थानकाला भेट दिली असता रेल्वे स्थानकावर बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची कुठलीच तपासणी केली जात नव्हती.

- मुंबई, पुणे, तसेच इतर ठिकाणातून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग अथवा त्यांच्या नावाची नोंदणी सुध्दा केली जात नव्हती.

- लॉकडाऊनच्या काळात रेल्वे स्थानकाच्या प्रवेशव्दारासमोर चौकशी कक्ष सुरु केले होते ते सुध्दा आता गायब झालेले आढळले.

.........

जिल्हा सीमा

- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी असल्याने अद्यापही जिल्हा सीमेवर तपासणी नाके सुरु करण्यात आलेले नाही.

- त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातील नागरिक बिनधास्तपणे ये-जा करीत आहे.

- जिल्हा सीमेवर कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने तपासणी करण्याची कुठलीच प्रक्रिया सुरू नाही.

.......