गोंदिया : जिल्ह्यातही आता कोरोना आपले पाय पसरत असून, परिणामी बाधितांची संख्या वाढू लागली आहे. यामुळेच आता जिल्ह्यात बाधितांची संख्या जास्त व मात करणारे कमी असेच आकडे येऊ लागले आहेत. मात्र शनिवारी (दि. १३) बाधितांपेक्षा मात करणारे जास्त दिसून आल्याने दिलासा मिळाला. शनिवारी (दि. १३) जिल्ह्यात २४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली असतानाच १५ बाधितांची भर पडली आहे. यानंतर आता जिल्ह्यातील बाधितांची संख्या १४,६६५ झाली असून १४,२९० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात कोरोना कहर करीत असतानाच फेब्रुवारीच्या मध्यापासून जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यामुळेच आता बाधितांची संख्या जास्त तर मात करणारे कमी होऊ लागले होते. त्यात कधी-कधी मात करणारे जास्त होत असल्याने दिलासा मिळतो. शनिवारी असाच दिलासा देणारे आकडे जिल्ह्यात नोंदविण्यात आले आहेत. शनिवारी जिल्ह्यात १५ रुग्णांची भर पडली. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ८, तिरोडा २, आमगाव ३ तर सालेकसा तालुक्यातील २ रुग्ण आहेत. तसेच २४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील १६, तिरोडा ४, आमगाव १ तर सडक-अर्जुनी तालुक्यातील ३ रुग्ण आहेत.
यानंतर आता जिल्ह्यात १८८ क्रियाशील रुग्ण असून यात गोंदिया तालुक्यातील ११७, तिरोडा ११, गोरेगाव ६, आमगाव २४, सालेकसा ७, देवरी १२, सडक-अर्जुनी ५, अर्जुनी-मोरगाव ४ तर इतर राज्य व जिल्ह्यातील २ रुग्ण आहेत. यातील १४६ रुग्ण घरीच अलगीकरणात असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ९७, तिरोडा ८, गोरेगाव ३, आमगाव १९, सालेकसा ५, देवरी ९, सडक-अर्जुनी ३ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २ रुग्ण आहेत. या स्थितीनंतर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४४ टक्के असून मृत्युदर १.२० टक्के तर द्विगुणीत गती ३८०.२ दिवस एवढी नोंदण्यात आली आहे.
-----------------------------
आतापर्यंत १८७ रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात कोरोनाच्या कहरामुळे आतापर्यंत १८७ रुग्णांचा जीव गेला आहे. तालुकानिहाय बघितल्यास गोंदिया तालुक्यातील १०५, तिरोडा २४, गोरेगाव ६, आमगाव १३, सालेकसा ३, देवरी १०, सडक-अर्जुनी ५, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ११ तर इतर राज्य व जिल्ह्यातील १० रुग्ण आहेत.
-----------------------
१,५५,९७२ कोरोना चाचण्या
कोरोनाचा वाढता उद्रेक बघता आता जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १,५५,९७२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ८१,१२१ आरटी-पीसीआर चाचण्या असून यात ८,६९९ पॉझिटिव्ह तर ६८,०१५ निगेटिव्ह आहेत. तसेच ७४,८५१ रॅपिड अँटिजेन चाचण्या असून यातील ६,२५८ पॉझिटिव्ह तर ६८,५९३ निगेटिव्ह आल्या आहेत.