कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सोमवारी १४० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १२५ नमुन्यांची आरटीपीसीआर तर १५ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोना पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट शून्य होता. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४,४८,६०२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २,२९,०३४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २,१९,५६८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ४१,२०८ नमुने कोरोना बाधित आढळले. यापैकी ४०,४९६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यात आठ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
..........
६४ टक्क्यावर लसीकरण
कोरोना संसर्गाला प्रतिबंध लावण्यासाठी जिल्ह्यातील ११० केंद्रावरून लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत ८,३२,६११ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जवळपास ६४ टक्के लसीकरण पूर्ण झाले असून मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात लसीकरणाला वेग आल्याचे चित्र आहे.
................
संसर्ग आटोक्यात तरी काळजी घ्या
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आहे. त्यामुळे काही जण पुन्हा निष्काळजीपणे वागू लागले आहे. मास्कचा वापर करणेसुद्धा बंद केले आहे. मात्र कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नसून पूर्वी इतकीच काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करीत काळजी घ्यावी.
- डाॅ. नरेश तिरपुडे, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.
.......
सणासुदीच्या दिवसात घ्या काळजी
जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असली तरी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. तरच जिल्ह्यात लवकर कोरोनामुक्त होईल. सध्या सणासुदीचे दिवस असून नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन गरजेचे आहे.
- डॉ. अमरिश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक केटीएस.
..............
आपले थोडेही दुर्लक्ष ठरू शकते घातक
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. ही लाट येऊच जिल्हा कोरोनामुक्त राहावा यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे तेवढ्याच गांभीर्याने पालन करण्याची गरज आहे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग आदी गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा आपले थोडेही दुर्लक्ष कोरोनाला पुन्हा निमंत्रण देणारे ठरू शकते.
- डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी.