शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

दिलासा ! कोरोना बाधितांची वाढ नाही, तर एकाची मात्र घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 5:00 AM

फक्त एका बाधितावर आलेली जिल्ह्यातील संख्या आता बघता-बघता सातवर पोहोचली आहे. यामुळे जिल्हावासीय व आरोग्य विभागाच्या टेन्शनमध्ये भर पडली होती. सर्वत्र जेथे तिसऱ्या लाटेबाबत बोलले जात आहे तेथेच नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यात हळुवार का असो ना मात्र बाधित वाढल्याने धोका दिसून येत होता. मात्र, शनिवारी (दि.११) जिल्ह्यात एकाही बाधिताची नोंद घेण्यात आली नसून उलट एक बाधिताने कोरोनावर मात केल्याने आठवर असलेली बाधितांची आता सात झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  हळुवार का असेना मात्र बाधितांची संख्या चढल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली होती. मात्र, आता बाधितांची वाढ होत नसल्याने दिलासा मिळाला आहे. त्यात शनिवारी (दि.११) जिल्ह्यात बाधिताची वाढ न होता एकाने मात्र कोरोनावर मात केल्याचे दिसून आले. ही बाब नक्कीच दिलासादायक असली तरीही नागरिकांची खबरदारी घेणे आता आणखीच गरजेचे झाले आहे. फक्त एका बाधितावर आलेली जिल्ह्यातील संख्या आता बघता-बघता सातवर पोहोचली आहे. यामुळे जिल्हावासीय व आरोग्य विभागाच्या टेन्शनमध्ये भर पडली होती. सर्वत्र जेथे तिसऱ्या लाटेबाबत बोलले जात आहे तेथेच नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यात हळुवार का असो ना मात्र बाधित वाढल्याने धोका दिसून येत होता. मात्र, शनिवारी (दि.११) जिल्ह्यात एकाही बाधिताची नोंद घेण्यात आली नसून उलट एक बाधिताने कोरोनावर मात केल्याने आठवर असलेली बाधितांची आता सात झाली आहे. जिल्ह्यातील सहा तालुके सध्या कोरोनामुक्त असून अर्जुनी-मोरगाव तालुक्यात चार तर देवरी तालुक्यात सध्या तीन ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे आता या दोन तालुक्यांतील नागरिकांना जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे. सध्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून, पुढे सणावारांचे दिवस असल्याने नागरिकांची गर्दी होणार. मात्र, आपल्या जिल्ह्याला आता तिसऱ्या लाटेपासून मुक्त ठेवण्यासाठी जिल्हावासीयांनी अत्यधिक खबरदार राहण्याची गरज दिसून येत आहे. 

सहा रुग्ण घरीच अलगीकरणात - जिल्ह्यात शनिवारी एका रुग्णाने कोरोनावर मात केल्यानंतर आता ॲक्टिव्ह रूग्ण संख्या सात झाली आहे. यातील सहा रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. म्हणजेच, एक रुग्ण  उपाचारात असायला पाहिजे. एकंदर स्थिती नियंत्रणात असली तरीही नागरिकांनी धोका पत्करण्यापेक्षा संयमाने घेणेच चांगले राहील. 

सणासुदीत गर्दी वाढून हेच वातावरण कोरोनाला फोफावण्यासाठी पोषक ठरते. त्यामुळे आता नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यात कोरोनाला पाय पसरू न देण्यासाठी प्रत्येकाने कोरोना नियमांचे पालन करण्याची खरी गरज आहे. शिवाय, प्रत्येकाने लसीचे दोन्ही डोस घ्यावे व कुटुंबीयांचेही लसीकरण लवकरात लवकर करवून घ्यावे. - करण चव्हाण मुख्याधिकारी, नगर परिषद, गोंदिया

आता खबरदारी घेण्याची गरज आता सणासुदीला सुरुवात झाली असल्याने नागरिकांनी गर्दी करण्यापेक्षा अधिकच खबरदारीने वागण्याची गरज आहे. तिसऱ्या लाटेबाबत बोलले जात असून, आपला जिल्हा आता सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी नियमांचे करावे. तसेच लवकरात लवकर लसीकरण करवून स्वत:ला व परिवाराला सुरक्षित करावे. - अशोक इंगळे नगराध्यक्ष, गोंदिया. 

जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात असली तरी अतिरेक न करता नागरिकांनी संयमाने घेण्याची हीच खरी वेळ आहे. कोरोना नियमांचे पालन करूनच आपण आपल्या जिल्ह्यातून कोरोनाला घालवू शकतो. त्यामुळे आता जास्तीत जास्त खबरदारीने वागावे व आपले तसेच परिवारातील प्रत्येकच व्यक्तीचे लसीकरण करवून घ्यावे. -भावना कदम सदस्य, नगर परिषद गोंदिया 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या