कोरोनाच्या भीतीदायक वातावरणातही शेकडो लोकांना रोजगाराचा आधार या कामातून मिळाला आहे. मागेल त्याला रोजगार उपलब्ध करून देण्याच्या योजनेमुळे रोजगाराचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे कामासाठी कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नसून, गावातच रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. शेतकरी, शेतमजुरांच्या उपजीविकेचा प्रश्न महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुटण्यास मदत झाली आहे. वैयक्तिक, तसेच सामूहिक स्वरूपाच्या कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिल्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर कामे उपलब्ध करून देत गुरुवारला सुरू झालेल्या कामावर ४५० मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावेळी रामकिशोर रहांगडाले, सदस्य विजय भोयर, सदस्य पालिका राऊत, नरेश परतेकी, धनराज राऊत, तसेच रोजगार सेविका निर्मला कोसरे व मोठ्या प्रमाणात मजूर कामावर उपस्थित होेते.
मनरेगाच्या माध्यमातून विकास कामांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 4:28 AM