रब्बी हंगामातील धान पिकांची कापणी व मळणी होऊनही जिल्ह्यात धान खरेदीचे चित्र स्पष्ट नव्हते व त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. हमीभाव केंद्र सुरू न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपले पीक व्यापाऱ्यांना कवडीमोल भावात विकले. अशा विपरित परिस्थितीत खासदार पटेल व आमदार चंद्रिकापुरे यांच्या प्रयत्नाने धान खरेदी सुरू झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
यावेळी वि.का.से. संस्थेचे अध्यक्ष लुनकरण चितलंगे, संचालक शिवराम लोदी, मधुकर पर्वते, तुलाराम लांजेवार, ललित बाळबुद्धे, दुर्गाप्रसाद पालीवाल, राकेश लंजे, किशोर शहारे, लोकेश उखरे, विठ्ठल गहाने, रोहिदास शहारे, यादोराव कुंभरे, नाना शहारे, प्रमोद लांजेवार, कृ. उ. बा. स प्रशासक उद्धव मेहंदळे, प्रशासक लोकपाल गहाने, सचिव एस. एल.चांदेवार, ग्रेडर डी. बी. शहारे, संगणक परिचालक गुलचंद बावने, हमाल, कामगार आणि शेतकरी उपस्थित होते.