शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर

By admin | Published: February 17, 2017 1:52 AM

येथे गेल्या दोन महिन्यांपासून घरगुती गॅस धारकांना गॅस मिळणे कठीण झाले आहे.

सौंदड : येथे गेल्या दोन महिन्यांपासून घरगुती गॅस धारकांना गॅस मिळणे कठीण झाले आहे. शासन नियमाने एक गॅस धारकाला वर्षापोटी १२ सिलेंडर देणे बंधनकारक आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही गॅस सिलेंडरचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून अनेक सिलेंडर धारकांना अद्याप आॅनलाईन बुकींग करूनही गॅस मिळणे कठीण झाले आहे. विदर्भातील गोंदिया व भंडारा जिल्हा वेगळे झाले. मात्र सडक-अर्जुनी तालुक्यात अजूनही कुठल्याही कंपनीची गॅस एजंसी नसल्याने संबंधीत ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यामध्ये अनेक गॅस एजंसी आहेत व जिल्ह्याबाहेरील अनेक एजंसी धारक तालुक्यामध्ये गॅस एजसी चालवत आहेत. परंतु राशनधारक ग्राहकाला वेळेवर गॅस उपलब्ध होत नसल्याने राशन धारकांना स्वयंपाकाकरीता लाकडांचा आसरा घ्यावा लागत आहे. शासनाने नुकतीच उज्वल गॅस योजना सुरु केली आहे. परंतु जुन्याच राशन धारकाना गॅस मिळत नसल्याने या योजनेचा फज्जाच उडाल्यासारखे होय. परिसरातील अनेक धाबे, हॉटेल्स, चहाटपऱ्या, नास्ता, गॅस वेल्डींग, कॅटरर्स, वाहन व अनेक व्यवसायीकांच्या भट्टीवर घरगुती वापराचे गॅस सिलेंडर सर्रासपणे दिसून येते. मात्र व्यवसायीकांना एलपीजी गॅस सिलेंडर कसे व कुठून उपलब्ध होतात ही बाब गुलदस्त्यात आहे.संबधीत गॅस धारक किंवा डिलेवरी बॉय शासन नियमाला न जुमानत व काळ्या बाजारातून उपलब्ध करून देत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. आॅनलाईन बुकींग करूनही नागरिकांना दोन-दोन महिन गॅस मिळत नाही. परंतु ब्लॅकमध्ये केव्हा व कधीही कुठल्याही कंपनीचा गॅस त्वरीत उपलब्ध करून देण्याकरीता अवैध व्यवसायीक तत्पर असल्याचे दिसून येत आहे. मात्र याकडे संबंधीत अधिकाऱ्यांचा कानाडोळा आहे. तसेच या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मात्र पाणी कुठे मुरते हे त्याचे त्यांनाच माहिती. मात्र सामान्य गॅस धारक त्रस्त होतांना दिसून येतो. अनेकदा सिलेंडर संपल्यास दुसरा सिलेंडर सणासुदीच्या काळात मिळविणे कठीण जाते. अनेकदा पायपीट करूनही ग्राहकांना सिलेंडर उपलब्ध होत नाही. ग्राहकांना सिलेंडरचा सुरळीत व नियमित पुरवठा न होण्यामागे जबाबदार कोण? असा सवाल नागरिक करीत आहेत. संबंधीत विभागाने याची दखल घेण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)