२२ ला कार्यशाळा : जिल्हाभरातील अत्याचारग्रस्तांना मार्गदर्शन गोंदिया : कौंटुबिक हिंसाचार प्रतिबंध कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी येत्या २२ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळा व जनसुनावणीसाठी गोंदियात महिला आयोग आपल्या दारी या उपक्र माचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य महिला आयोग मुंबईतर्फे व महिला-बाल विकास विभागाच्या संयुक्त वतीने हा कार्यक्र म आयोजित करण्यात आला आहे. कौंटुबिक हिंसाचारापासून महिलांना संरक्षण व सुरक्षीतता मिळावी म्हणून या कायद्याची जाणिव जागृती व त्याची अंमलबाजावणी व्हावी तसेच कायद्याच्या नियमातील तरतुदींची माहिती या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संरक्षण अधिकारी, विधी सल्लागार, समुपदेशक व स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधींना व्हावी तसेच बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या वैवाहिक समस्यांचे निराकरण व्हावे असा कार्यक्रमाचा उद्देश आहे. कार्यशाळा जनसुनावणीसाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील पिडीत महिलांना स्थानिक पातळीवर तात्काळ मदत व्हावी, कोणतीही पिडीत महिला कसलीही पुर्वसूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली लेखी समस्या आयोगाकडे सादर करता येईल. तक्र ारदार महिलेस सुनावणीस उपस्थित संबंधित अधिकारी, विधीसेवा प्राधिकरण, पोलीस विभाग, समुपदेशन केंद्र यांचेकडून तात्काळ सेवा उपलब्ध होईल. जनसुनावणीस पोलीस स्टेशन आवारातील समुपदेशन केद्र, समाजकल्याण विभागाचे समुपदेशन केंद्र, जिल्हा परिषद व नगरपरिषद यांच्याकडील समुपदेशन केंद्रात सुरु असलेल्या तक्र ारी तसेच ऐनवेळी प्राप्त तक्र ारी जनसुनावणीस ठेवता येणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
हिंसाचार रोखण्यासाठी आयोग आपल्या दारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2017 1:08 AM