शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

शेतकरी, मजूर आणि कामगारांसाठी वचनबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 10:31 PM

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी अटल विश्वकर्मा सन्मान योजना राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रथमच सुरू केली. माझ्यावर लोकांनी विश्वास केला, त्याला तडा जाऊ देणार नाही. शेतकरी, शेतमजूर व गवंडी कामगार यांच्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांचा लाभ मिळवून देणार. त्यासाठी मी वचनबध्द आहे, असा विश्वास आ. विजय रहांगडाले यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : अटल विश्वकर्मा सन्मान योजना

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी अटल विश्वकर्मा सन्मान योजना राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रथमच सुरू केली. माझ्यावर लोकांनी विश्वास केला, त्याला तडा जाऊ देणार नाही. शेतकरी, शेतमजूर व गवंडी कामगार यांच्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांचा लाभ मिळवून देणार. त्यासाठी मी वचनबध्द आहे, असा विश्वास आ. विजय रहांगडाले यांनी व्यक्त केला.दवनीवाडा येथे शेतकरी, शेतमजूर व कामगारांचा मेळावा घेण्यात आला. यात अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.याप्रसंगी प्रामुख्याने कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजा सोनेवाने, जि.प. सदस्य छाया दसरे, पं.स. सदस्य गुड्डू लिल्हारे, सरपंच बेबीनंदा चौरे, रमेश चिल्हारे, कमलेश दमाहे, नेहरु उपवंशी, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, कामगार सहआयुक्त मसराम, सहायक खंडविकास अधिकारी झामसिंग टेंभरे, डॉ. बसंत भगत, काशीराम लांजेवार, सुरेश पटले, भूमेश्वर पिपरेवार, तहसीलदार भलावी, विस्तार अधिकारी खोटेले, मंडळ अधिकारी पोरशेट्टीवार, तलाठी कापगते तसेच परिसरातील सर्व सरपंच, सदस्य, पंचायत समिती सदस्य व कामगार उपस्थित होते.आमदार रहांगडाले म्हणाले, मंडळातर्फे बांधकाम कामगारांसाठी २८ विविध कल्याणकारी योजना आहेत. त्यांचा लाभ १८ ते ६० वयोगटातील कामगारांनी घेण्यासाठी नोंदणी शुल्क भरुन नोंदणी करावे. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामगार आहेत. त्यासाठी विशेष बाब म्हणून ४ जुलै ते ४ आॅगस्ट २०१८ या कालावधीत नोंदणी करावी. यात मनरेगा मजूर, गवंडी काम, सुतार, इमारत, रस्ते, रेल्वे, ट्रामवेज, एअर फिल्ड, पाटबंधारे, पूर, टॉवर, कालवे, जलाशय, तेलवायु, विद्युत, पूल, सेतू, पाईपलाईन, दगडकाम या २१ कामांचा समावेश आहे, असे सांगितले.उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनीही मार्गदर्शन केले व सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना नोंदणीबद्दल निर्देश दिले. तसेच कोणत्याही कामगाराची फसवणूक करू नये, असे सांगितले. सभापती सोनवाने व कामगार आयुक्त मसराम यांनीसुद्धा कामगारांना मार्गदर्शन केले.या ठिकाणी नोंदणी झालेल्या पाच कामगारांना नोंदणी प्रमाणपत्र आ. रहांगडाले यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या वेळी छाया जगणित, इंद्रा बिंझाडे, गणेश लिल्हारे, कमला कोहरे यांचा नोंदणी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक खंडविकास अधिकारी टेंभरे यांनी मांडले. संचालन महेंद्र बघेले यांनी केले. आभार गुड्डू लिल्हारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी राजेश उरकुडे, बंटी श्रीबांसरी, सुरेश पटले, कैलाश गौतम, पप्पाजी अटरे, कन्हैया नागपुरे, संतोष सूर्यवंशी, बनेश लिल्हारे, रमेश उजगावकर, सुनिता लिल्हारे, मनोरमा चवरे, सुनिता पन्डेले, सरस्वती सूर्यवंशी, गिरजा मानकर, निरज सोनवाने, सविता पटले, कांता सूर्यवंशी, ग्रामसेवक, रोजगार सेवक व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.