गोंदिया : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने रब्बी हंगामातील धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागातील अनेक घरांना व तसेच शेतातील झाडे ही कोसळल्याची माहिती आहे. नुकसानग्रस्त भागाची चौकशी करून व त्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली आहे. याबाबतचे पत्र आ. फुके यांनी मुख्यमंत्री तसेच पुनर्वसन मंत्री यांना पाठविले.
भारतीय हवामान विभागाच्यावतीने निर्देशित अंदाजानुसार आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविली होती. विशेष म्हणजे जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून सायंकाळच्यासुमारास वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी जिल्ह्यातील अनेक भागात येत होत्या. यामुळे ही शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त भागाची चौकशी करून व त्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली आहे.