शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
Video - "मला ४० लाख..."; कर्ज फेडण्यासाठी Axis बँकेत घातला दरोडा, मॅनेजरला दिली धमकी
4
'चिप'सारख्या वस्तुंमध्ये कटाची भीती! इस्त्रायलच्या पेजर स्फोटानंतर चीनबाबत सरकार अलर्टवर
5
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
6
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
7
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
8
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
9
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
10
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
11
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
12
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
13
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
14
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
15
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
16
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
17
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
18
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
19
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 

जलयुक्त शिवाराची २२४५ कामे पूर्ण

By admin | Published: June 25, 2017 12:52 AM

राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्या सुरू करण्यात आला.

२९.८६ कोटी खर्च : जिल्ह्यातील ४२६ कामे प्रगतीपथावर लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्या सुरू करण्यात आला. सन २०१६-१७ या वर्षाचे ८५.०५ टक्के काम पूर्ण झाले. जिल्ह्यात आतापर्यंत २२४५ काम पूर्ण झाले असून ४२६ कामे प्रगतीपथावर आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुसऱ्या टप्यात २०१६-१७ मध्ये ७७ गावांची निवड करण्यात आली होती. त्या गावांपैकी २६७१ काम सुरू करण्यात आले. यातील २३ जून पर्यंत २२४५ काम पूर्ण करण्यात आले. या कामांवर मार्च अखेरपर्यंत २९.८६ कोटी रूपये खर्च करण्यात आले. जिल्ह्यात प्रत्येक नागरिकाला जल साक्षर करण्यासाठी तसेच जल समृध्दीतून आर्थिक समृध्दीसाठी कृषि विभागाद्वारे सुरू करण्यात आलेल्या विशेष अभियानाला नागरिकांचे सहकार्य मिळत आहे. या अभियानाच्या दुसऱ्या टप्यात माती नालाच्या ९ बांधकामापैकी ५ काम पूर्ण झाले आहेत. गैबियन स्ट्रक्चरच्या २१२ पैकी २०९, समतल चराच्या ९२ पैकी ८५, माती नालाबांध दुरूस्ती व माती काढण्याच्या १०२ कामांपैकी ७१, साखळी सीमेंट बंधारे ७५ पैकी ३७ सिमेंट बंधारे, दुरूस्ती, माती काढण्याच्या १०४ पैकी ९२ कामे, नाला खोलीकरणाच्या २३३ पैकी १९६ कामे, केटी वेयर दुरूस्ती ६ पैकी ४, वनतळी ८ पैकी ४, भातखाचर १०१८ पैकी ९३९, बांधच्या ९ पैकी १, बोडी खोलीकरण व जून्या बोडीच्या दुरूस्तीच्या ४७० पैकी ४०५, तलाव खोलीकरण व दुरूस्तीच्या ६७ पैकी ४३, मामा तलाव दुरूस्तीच्या १०३ पैकी २७, लघु सिंचन तलाव दुरूस्तीच्या १८ पैकी ५ कामे, शेततळीच्या १२२ कामांपैकी ११७ तलाव खोलीकरण, तलाव दुरूस्ती सीएसआरचे १३ ही कामे पूर्ण झाले आहेत. या अभियानांतर्गत आतापर्यंत करण्यात आलेल्या कामांवर २१ कोटी ८६ कोटी खर्च करण्यात आले आहेत. यात गैबियन स्ट्रक्चरवर २० लाख २ हजार, समतल चरावर ४३ लाख २ हजार, माती नाला बांधकामावर २१ लाख ४ हजार, साखळी सीमेंट बंधाऱ्यांवर १ कोटी ८४ लाख, सिमेंट बंधारे दुरूस्तीवर ७३ लाख, नाला खोलीकरणवर ४ कोटी ९६ कोटी, केटी वेयर ९ हजार, कालवा दुरूस्तीवर ४२ हजार, माती काढण्यावर ७३ हजार, वन तलावावर ७ हजार, भात खाचर दुरूस्तीवर ५ कोटी ९९ लाख, बंधारे दुरूस्तीवर ५१ लाख १ हजार, बोडी खोलीकरणवर ८९ हजार, तलाव खोलीकरणार १ कोटी ९२ लाख, मामा तालाव दुरूस्तीवर ९७ हजार, लघु सिंचन तलाव दुरूस्तीवर ७३ हजार, शेततळीवर १ कोटी ९९ लाख व तलाव खोलीकरण, दुरूस्ती, सीएसआरवर २४ हजार रूपये खर्च केले. कृषि विभागाच्या १८०७ पैकी १५४८ काम पूर्ण करण्यात आले. २५९ कामे प्रगतीवर आहेत. जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाचे १७२ पैकी ६४ काम पूर्ण झाले आहेत. परंतु १०८ कामे प्रगतीवर आहेत. पंचायत समितीच्या १५३ पैकी १४६ कामे झाले आहेत. ७ कामे प्रगती पथावर आहेत. वन विभागाच्या ५२२ पैकी ४७२ कामे पूर्ण झाली असून ५० कामे प्रगती पथावर आहेत. जलयुक्त शिवार अभियनामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढत आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी या योजनेची मदत होणार आहे. तलावातील पाण्यामुळे अडेल उद्दीष्टपूर्ती जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाचे ८५.०५ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहेत. ४२६ काम प्रगतीपथावर आहेत. परंतु उद्दीष्टपूर्ती करण्यासाठी तलावात भरला असलेला पाणी अडचण करीत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत माती नाला बंधारे ४, गैबियन स्ट्रक्चर १२, समतल चर ७, माती नाला बंधारे दुरूस्ती ३१, साखळी सिमेंट बंधारे ३८, सिमेंट बंधारे दुरूस्ती १२, नाला खोलीकरण ३७, केटी वेयर दुरूस्ती २, कालवा दुरूस्ती २, माती काढणे सीएसआर ८, वन तलाव ४, भात खाचर ७१, पाणी भंडारण बंधारे ८, बोडी दुरूस्ती ६५ तलाव खोलीकरण २४, मामा तलाव खोलीकरण ७६, लघु सिंचन तलाव दुरूस्ती १३, शेततळी ५ कामे प्रतीपथावर आहेत. जलयुक्त शिवारामुळे बंधाऱ्यात पाणी भरला असल्यामुळे ती कामे करण्यासाठी समस्या होत आहे.