लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे रोवणीच्या कामाला वेग आला असून आत्तापर्यंत ५५ टक्के रोवण्या पूर्ण झाल्या आहे. तर अद्यापही ४५ टक्के रोवण्या शिल्लक आहे. रोवणीला विलंब होत असल्याने याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्यात यंदा एकूण १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानाची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केली.यंदा जून आणि जुलै महिन्यात पाऊस न झाल्याने पऱ्हे टाकण्यास विलंब झाला.तर त्यानंतर पुन्हा पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात रोवणीची कामे पूर्णपणे ठप्प पडली होती. पावसाअभावी दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली तर रोवणीच्या कामाला सुध्दा वेग आला आहे. शनिवारपर्यंत जिल्ह्यात ५५ टक्के रोवण्या पूर्ण झाल्या होत्या. तर मागील वर्षी याच तारखेपर्यंत ९५ टक्के रोवण्या पूर्ण झाल्या होत्या.त्यातुलनेत अद्यापही ४५ टक्के रोवण्या शिल्लक आहे. तर मागील दोन दिवसांपासून पावसाने सुध्दा उघडीप दिली आहे.जिल्ह्यात पाहिजे तसा दमदार पाऊस न झाल्याने उन्ह तापल्यास बांध्यामध्ये जमा झालेले पाणी सुध्दा आटण्याची शक्यता आहे.तसे झाल्यास रोवणीची कामे सुध्दा पुन्हा खोळंबण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यात आत्तापर्यत सरासरी ७४ टक्के पाऊस झाला असून अजूनही ११ टक्के पावसाची तूट कायम आहे.तर सिंचन प्रकल्प अद्यापही ६० टक्के भरलेले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांसह जिल्हावासीय सुध्दा चिंतेत आहे.तिरोडा तालुक्यात कमी पाऊसजिल्ह्यात आतापर्यंत सर्वात कमी पावसाची नोंद तिरोडा तालुक्यात झाली आहे. परिणामी या तालुक्यात रोवणीची टक्केवारी सुध्दा कमी आहे.कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील तीन महसूल मंडळात रोवण्या कमी झाल्या आहेत.
जिल्ह्यात ५५ टक्के रोवण्या पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 8:47 PM
जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे रोवणीच्या कामाला वेग आला असून आत्तापर्यंत ५५ टक्के रोवण्या पूर्ण झाल्या आहे. तर अद्यापही ४५ टक्के रोवण्या शिल्लक आहे. रोवणीला विलंब होत असल्याने याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ठळक मुद्देपावसाची विश्रांती : मागील वर्षीच्या तुलनेत स्थिती बिकट