लोकमत न्यूज नेटवर्क बाराभाटी : स्थानिक रेल्वे स्थानकाचे सपाटीकरण अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही. फक्त अर्धेच काम झालेले असून पूर्ण केव्हा होणार? असा सवाल परिसरातील प्रवाशी करीत आहेत. गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वे मार्गावर जिल्ह्यातील बाराभाटी स्थानकाची ही स्थिती आहे. स्थानकाकडून येरंडी गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर हे अर्धवटच काम झालेले दिसून येत आहे. या रेल्वे स्थानकावर रेल्वे विभागाने अर्धवट काम केल्याने प्रवाशांना चढायला-उतरायला त्रास होत आहे. स्टेशनच्या पिवळ्या रंगाच्या फलकापासून काही अंतरावरच मुरुम टाकून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र संपूर्ण स्थानकाचे सपाटीकरण झाले नाही. जवळपास ५०-७० मीटरचे काम रेंगाळले आहे. या ठिकाणी अजूनही नालीच ठेवली आहे. या खोलगट भागातून चढता-उतरता येत नाही. अशावेळी प्रवाशांची कसरत होते. म्हाताऱ्या प्रवाशांना पडणे, खरचटणे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. ट्रेनच्या बोगी खूप दूरवर असतात. त्यामुळे अशा समस्या निर्माण होत आहेत. सदर रेल्वे स्थानकात खूप समस्या आहेत. प्रतीक्षालयात कचरा साचून आहे. भिंती खर्राच्या थुंकीने रंगलेल्या आहेत. प्लास्टीकचे पाऊच कोपऱ्याकोपऱ्यात जमा आहेत. अशा अनेक समस्यांनी सदर रेल्वे स्थानक ग्रासले आहे. काय आहेत समस्या मुत्रीघर नसल्याने उघड्यावरच लघुशंका बसायला पुरेशी बैठक व्यवस्था नाही प्रतीक्षालयात घाणीचे साम्राज्य थांब्याचा कालावधी अल्प गाडी थांबते तेथपर्यंत सपाटीकरणाचा अभाव
रेल्वे स्थानकाचे सपाटीकरण पूर्ण करा
By admin | Published: June 14, 2017 12:40 AM