शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

महसूल वसूली वेळेत पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:10 PM

विविध यंत्रणांना लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी आणि विकास कामे करण्यासाठी निधी देण्यात येतो.

ठळक मुद्देअनुप कुमार : विविध यंत्रणा व महसूल विभागाचा आढावा

आॅनलाईन लोकमतगोंदिया : विविध यंत्रणांना लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी आणि विकास कामे करण्यासाठी निधी देण्यात येतो. महसूल विभागाला महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात येते. यंत्रणांनी व महसूल विभागाने आपली कामे नियोजनातून निर्धारित वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात शनिवारी (दि.२५) विविध यंत्रणा व महसूल विभागाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, उपवनसंरक्षक एस.युवराज, उपायुक्त सुधाकर तेलंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एस.बी.मुंडे उपस्थित होते.अनुप कुमार पुढे म्हणाले, यावर्षी पाऊस कमी आल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. भविष्यात पाणी टंचाईचे संकट निर्माण होणार आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे नियोजन आतापासूनच करावे. भूजल संरक्षण अधिनियम कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असेही सुचविले.जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा असे सांगितले. धापेवाडा टप्पा-२, झाशीनगर उपसा सिंचन योजना, निमगाव प्रकल्प, पिंडकेपार-डांगुर्ली प्रकल्प, मानागड प्रकल्प या प्रकल्पांच्या पुर्णत्वाला गती मिळाली पाहिजे. बिरसी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवावे, जिल्हा परिषदेतील वर्ग-२ ची रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्रत्येक कुटूंबातील व्यक्ती शौचालयाचा नियमीत वापर करतील यासाठी प्रवृत्त करावे, बँकेशी समन्वय साधून सहकार विभागाने पीक कर्ज योजनेचे पैसे पात्र शेतकºयांच्या खात्यात उपलब्ध होताच जमा करावे, असे सांगीतले.धडक सिंचन विहिर कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकºयांना संरक्षीत सिंचनाची व्यवस्था निर्माण होणार असल्याचे सांगत त्यांनी जिल्ह्यातील शेतकºयांना इतर पिके घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात यावे, असे सांगीतले. याप्रसंगी रविंद्र ठाकरे म्हणाले, डिसेंबर अखेरपर्यंत पाणीटंचाई भासणाºया गावांचे नियोजन करण्यात आले असून रब्बी पिकांना सिंचनासाठी पाणी देण्यात येणार नाही. अवैध रेती उत्खनन होणार नाही याकडे लक्ष द्यावे, महसूली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून निर्धारित वेळेत उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.डॉ.भूजबळ यांनी, नक्षलग्रस्त भागातील रस्त्यांसाठी निधीची आवश्यकता विषद केली. पोलीस गृह निर्माण योजनेंतर्गत पोलिसांच्या शासकीय निवासस्थाने व पोलीस ठाण्याच्या इमारतबाबतची माहिती दिली.दिरंगाई करणाºयांची गय नाहीयाप्रसंगी अनुप कुमार यांनी रोहयोच्या माध्यमातून जास्तीत जास्त कामे उपलब्ध झाल्यास मजुरांच्या हाताला काम मिळेल. त्या माध्यमातून विकास कामे करताना जिल्हा राज्यात अव्वल कसा राहील याचे नियोजन करावे, यासाठी टिमवर्कम्हणून काम करावे. या कामात दिरंगाई करणाºयांची गय केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.रस्ते दुरूस्ती व पर्यटनस्थळांवर भरयाप्रसंगी अनुप कुमार यांनी, जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, रेतीघाटांमुळे ज्या गावांचे रस्ते खराब झाले आहे त्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी खनिज विकास प्रतिष्ठाणमधून निधी उपलब्ध करु न द्यावा, जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणात वाव असल्यामुळे पर्यटनस्थळांचा विकास करून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचे मार्केटींग करावे, निसर्ग संवर्धनासोबतच पर्यटनाच्या दृष्टीने देखील संवर्धन झाले पाहिजे असे म्हणाले.