शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
2
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
3
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
4
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
5
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
7
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
9
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
10
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
11
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
13
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
14
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
15
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
16
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
17
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
18
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल
19
बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही....
20
महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!

म्हणे, टॉस्क पूर्ण करा अन् पार्ट टाईममध्ये लाखो कमवा; ८ जणांवर गुन्हा

By नरेश रहिले | Published: January 19, 2024 7:53 PM

दोनवेळा पैसे परत करून विश्वास जिंकला: आठ जणांवर गुन्हा दाखल

गोंदिया: पार्ट टॉईम जॉब मधून लाखो रूपये कमविण्याचे आमिष देऊन तरूणाला ३ लाख ६६ हजाराने फसविण्यात आले. आपल्याला दिलेले टाॅस्क पूर्ण करा आणि लाखो रूपये मिळवा असे आमिष देत तरूणाला दोन वेळा व्याजासह पैसे परत करण्यात आले. परंतु तिसऱ्या वेळपासून त्याला पैसे परत न करता त्याला पैसे पाठविण्यास वारंवार तगादा लावणाऱ्या तिघांसह आठ जणांवर गोंदिया शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सेंदुरवाफा येथील ओमेरा तिलकचंद कापगते (३०) यांना पार्ट टाईम जॉबची गरज असल्याने ते जॉबच्या शोधात होते. अश्यातच व्हॉटसअप मोबाईलवर अमर नानोरीया या व्यक्तीने २३ सप्टेंबर २०२३ रोजी पार्ट टाईम जॉब देत असल्याचे सांगून त्यांचे खाते क्रमांकवर ऑनलाईन २८ सप्टेंबर रोजी वेगवेगळी रक्कम पाठविण्यास भाग पाडले. त्यांची तब्बल ३ लाख ६६ हजाराने फसवणूक करणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी आठ जणांवर भादंविच्या कलम ४२०, ३४ सहकलम ६६ (डी) माहीती तंत्रज्ञान कायदा अधिनियम २००० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखेडे करीत आहेत.प्रिपेड मिशनसाठी म्हणे पैसे भरावे लागतीलकापगते यांचा मोबाईल क्रमांक नैना फतीमा हिच्या टेलीग्रॉम आयडीसी जोडून आरोपीने सांगितले की, तुम्ही यु ट्युब चॅनेलला सबक्राईब केल्यानंतर तुम्हाला आमचे कंपनीमार्फत आपल्यास पैसे मिळणार आहेत. यासाठी त्यांच्या प्रिपेड मिशन ग्रुपला जॉईन करण्यास सांगितले. प्रिपेड मिशनसाठी पैसे भरावे लागतील असे सांगितले होते. त्यानुसार २६ सप्टेंबर रोजी आरोपींनी पाठविलेल्या लिंकवर पैसे पाठविले.

दोनवेळचे ५० हजार परत मिळाले२६ सप्टेंबर २०२३ रोजी पाठविलेल्या लिंकवर पाठविलेले तीन हजार त्याचदिवशी ४ हजार ४०० रुपये व्याजासह परत केले. त्याच दिवशी त्यांनी पुन्हा २५ हजार रुपये भरण्यास सांगितले. ते पैसे पाठविले. पुन्हा १० हजार भरण्यास सांगितले ते सुध्दा पाठविले. त्या ३५ हजाराचे १० हजार व्याजासह ४५ हजार पाठवून त्यांचा विश्वास जिंकला

पहिल्या टॉस्क पासूनच केली फसवणूकपहिल्या टॉक्समध्ये दोन वेळा पैसे मागून ते व्याजासह परतही केले. परंतु पहिल्या टॉस्कच्या तिसऱ्या वेळेस टाकलेले ३५ हजार, दुसऱ्या टॉस्कचे १ लाख ७७ हजार व तिसऱ्या टॉस्कचे १ लाख ५४ हजार पाठविले. ३ लाख ६६ हजार रूपये देऊनही परत न करता पुन्हा पुढील टॉसञक पूर्ण करण्यासाठी २ लाख ४० हजारासाठी तगादा लावत असतांना कापली फसवणूक झाल्याचे कापगते यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी चवथ्या टॉस्कचे पैसे पाठविले नाही.

आरोपीत यांचा समावेशपार्ट टॉईम जॉब देण्याच्या नावावर ३ लाख ६६ हजाराने फसवणूक करणाऱ्या आरोपीत अमर नानोरीया, नैना फतीमा, रॉयलु कॅफेचे खातेधारक, जॉस्वीन कॉस्मेटचे खातेधारक, ॲंगल इअर्ट मूवर्सचे खातेधारक, जहीरूल इस्लाम,कालींंदी मेडीकल स्टोर्सचे धारक व अजय शर्मा अश्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.