शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

नियोजनाअभावी गोंदियात लसीकरण केंद्रावर गोंधळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 6:17 PM

Gondia News गोंदिया येथे शनिवारी (दि.१५) १० केंद्रावर विशेष लसीकरण अभियान आयोजित केले होते. त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती. पण सकाळी ९.३० वाजतापर्यंत गोंविदपूर येथील केंद्रावर कर्मचारी न पोहचल्याने नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडाला होता. 

ठळक मुद्देऑपरेटर वेळेत न पोहचल्याने नागरिकांमध्ये संतापलसीकरण केंद्रावर सकाळपासूनच रांगा 

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने गोंदिया येथे शनिवारी (दि.१५) १० केंद्रावर विशेष लसीकरण अभियान आयोजित केले होते. त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती. पण सकाळी ९.३० वाजतापर्यंत गोंविदपूर येथील केंद्रावर कर्मचारी न पोहचल्याने नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडाला होता. 

स्थानिक प्रशासनाने शहरातील १० लसीकरण केंद्रावर शनिवारी विशेष लसीकरण मोहीम घेतली. यासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या केंद्रावर लसीकरण केले जाईल असे प्रसिध्द पत्रक काढण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यासाठी शहरातील १० केंद्रावर सकाळी ८ वाजतापासूनच गर्दी केली होती. शहरातील गोंविदपूर येथे नगर परिषद शाळेत लसीकरण केंद्र देण्यात आले होते. त्यामुळे या केंद्रावर नागरिकांनी लस घेण्यासाठी सकाळी ८ वाजतापासूनच रांग लावली. पण केंद्रावर सकाळी ९.३० वाजेपर्यंत ऑपरेटरच न आल्याने नागरिकांचा चांगला गोंधळ उडाला. नागरिकांचा गोंधळ वाढल्यानंतर केंद्रावरील काही कर्मचाऱ्यांनी ऑपरेटरला बोलाविले. ऑपरेटर आला मात्र लाॅगिंग आयडी आणि पासवर्ड न मिळाल्याने लसीकरणाला सुरुवात झाली नव्हती. याच सर्व गोंधळात १० वाजल्याने सकाळपासून रांगेत असलेल्या नागरिकांनी चांगलाच रोष व्यक्त केला. यामुळे या केंद्रावर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान १०.१५ वाजताच्या सुमारास लॉगिंग झाल्याने लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. मात्र या सर्व प्रकारामुळे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. नियोजनचा अभावस्थानिक प्रशासनाने शनिवारी गोंदिया शहरातील नगर परिषद शाळा गणेशनगर, नगर परिषद शाळा गोविंदपूर, नगर परिषद हायस्कूल रामनगर, नगर परिषद गर्ल्स हायस्कूल अग्रसेन भवनजवळ, जे. एम. पटेल शाळा अवंती चौक, मालवीय स्कूल श्रीनगर, मनोहर म्युनिसिपल हायस्कूल स्टेडियमजवळ, नगर परिषद शाळा माताटोली, नगर परिषद शाळा रेलटोली गुजराती शाळेजवळ, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभारेनगर या केंद्रावर लसीकरणाची सोय केली होती. यासाठी सकाळी ९ वाजताची वेळ देण्यात आली. पण ऑपरेटरच ९.३० वाजतापर्यंत केंद्रावर पोहचला नव्हता. तर लसीकरणाच्या संकेत स्थळाचे लाॅगिंग आयडी आणि पासवर्डचा घोळ कायम होता. एकंदरीत नियोजनाचा पूृर्णपणे अभाव होता.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस