लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी विधेयक पारित केल्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात युवक कॉँग्रेसच्यावतीने सोमवारी (दि.२८) शहरात आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनांतर्गत आंदोलनकर्ते बैलगाडी व ट्रक्टर घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धकडले व उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.सन २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांचे सशक्तीकरण करणार असल्याचे म्हटले होते. परंतु त्यांनी केलेली घोषणा केवळ पोकळ आश्वासन ठरले. शेतकऱ्यांना बळकट करण्याऐवजी थोड्या उद्योगपतींना खुश करून शेतकऱ्यांना उद्योगजकांचे गुलाम करणारे विधेयक आणले आहे. शेतकरी विरोधी हे विधेयक भाजपशासीत केंद्र सरकारद्वारे हिटलरशाही पद्धतीने पारित करण्यात येत आहे. नरेंद्र मोदी यांच्या हिटलरशाहीमुळे देशातील लोकांवर जिएसटी, नोटबंदी, सीएए लादण्यात आले. लॉकडाऊनमुळे देशातील गोरगरीब, छोटे-मध्यम व्यापारी व सुशिक्षीत तरूणांच्या नोकऱ्या गेल्या.देशाच्या आर्थीक व्यवस्थेचा कणा तुटला आहे. आता शेतकºयांची कंबर मोडण्यासाठी शेतकरी विरोधी विधेयक मोदी सरकारने आणले आहे. या विधेयकामुळे देशातील शेतकरी भयभित असल्याचे निवेदनात नमूद आहे. उपविभागीय अधिकारी सवरंगपते यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस कमिटी प्रदेश सचिव अमर वºहाडे, जिल्हाध्यक्ष डॉ. एन.डी. किरसान, तालुकाध्यक्ष सुर्यप्रकाश भगत, शहर अध्यक्ष जहिर अहमद, जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष आलोक मोहंती, दलेश नागदवने यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.बैलगाडी व टॅक्टर घेऊन धडककॉँग्रेसने केलेल्या या आंदोलनांतर्गत शहीद भोला भवन येथून बैलगाडी व ट्रॅक्टर घेऊन कॉँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकऱ्यांसह निघाले. गांधी प्रतिमा चौक, गोरेलाल चौक, जमनालाल बजाज पुतळा व नेहरू चौक होत सरकार विरोधी घोषणा देत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले.
कृषी विधेयक विरोधात काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 5:00 AM
सन २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांचे सशक्तीकरण करणार असल्याचे म्हटले होते. परंतु त्यांनी केलेली घोषणा केवळ पोकळ आश्वासन ठरले. शेतकऱ्यांना बळकट करण्याऐवजी थोड्या उद्योगपतींना खुश करून शेतकऱ्यांना उद्योगजकांचे गुलाम करणारे विधेयक आणले आहे. शेतकरी विरोधी हे विधेयक भाजपशासीत केंद्र सरकारद्वारे हिटलरशाही पद्धतीने पारित करण्यात येत आहे.
ठळक मुद्देबैलगाडी घेऊन एसडीओ कार्यालयावर धडक : राष्ट्रपतींना पाठविले निवेदन